close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

निकालाआधी राष्ट्रवादी-शिवसेनेचा जल्लोष, आमदार संजय कदमांवर गुन्हा दाखल

निकाल लागण्याआधीच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विजयचा दावा करत चक्क फटाके फोडत जल्लोष.  

Updated: Oct 23, 2019, 12:32 PM IST
निकालाआधी राष्ट्रवादी-शिवसेनेचा जल्लोष, आमदार संजय कदमांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : कोकणात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विजयचा दावा करत चक्क फटाके फोडत जल्लोष साजरा केला. दरम्यान, आमदार संजय कदम यांनी मिरवणूक काढल्याने त्यांच्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी आमदार संजय कदम यांना पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना थांबविण्याचे स्पष्ट बजावले. मात्र, कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव सुरुच होता. त्यानंतर पोलीस अधिकारी संतापलेत. त्यांनी जमावबंदीचा आदेश झुगारल्याचे सांगत आचारसंहिता कालवधीत तुम्ही असे करु शकत नाही, असे बजावत तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, असे स्पष्ट केले. त्यावेळी तिकडे काय चालले आहे, तेही बघा आणि तेही थांबवा असे कदम यांनी यावेळी म्हटले. दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार फटाके फोडले. 

निकालाआधीच विजयी मिरवणूक काढल्याने संजय कदम यांच्याबरोबर पत्नी सायली कदम, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार संजय कदम हे खेड येथे आल्यानंतर कार्यकर्ते जमा झालेत. त्यांनी खेड ते भरणे नाका अशी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी सगळ्यांना चांगलेच खडसावले. आचारसंहिता आहे, तुम्ही असंकाहीही करु शकत नाही. मात्र, कार्यकर्त्यांचा उत्साह सुरुच होता. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील चांगलेच संतापलेत. मी संजय कदम, वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करणार असे स्पष्ट केले. तुम्हीनंतर माझ्याकडे यायचे नाही, असेही त्यांनी यावेळी दोघांना बजावले. त्यावेळी संजय कदम यांनी पलिकडे काय सुरु आहे, तेही थांबवा असे सांगितले. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मिरवणूक रद्द करण्यास सांगितले.

दरम्यान, शिवसेनेच्यावतीने विजयाचा दावा करण्यात आला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी योगशे कदम यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार फटाकेबाजी केली आणि विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. त्यामुळे खेडमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. खेड पोलिसांनी आमदार संजय कदम यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.