थरार सीसीटीव्हीत । अंगणात झाडू मारणाऱ्या आजीच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचली

दिवसा ढवळ्या घराच्या अंगणात सोन साखळी खेचण्याची चोरट्यांची मजल गेली आहे. 

Updated: Oct 6, 2020, 07:56 PM IST
थरार सीसीटीव्हीत । अंगणात झाडू मारणाऱ्या आजीच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचली  title=

वर्धा : दिवसा ढवळ्या घराच्या अंगणात सोन साखळी खेचण्याची चोरट्यांची मजल गेली आहे. अंगणात आजी झाडू मारत होत्या. यावेळी एका तरुणाने पाळत ठेवून त्यांची पाठ वळताच गळ्यातील सोन साखळी खेचली आणि धूम ठोकली. दरम्यान, आजी अंगणात पडल्याने तिला प्रतिकारही करता आला नाही.

यशवंत नगर येथे सकाळी महिला आंगणात झाडू मारत असतांना एक तरुण श्वान सोबत उभा राहिला. काही वेळ श्वानासोबत घालविला आणि महिला घरात जातांना तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी पळवून नेली. ही घटना काल सकाळी घडलीय. या सर्व घटनेचा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आधीदेखील सोन साखळी पळवून नेण्याच्या घटना शहरात घडल्या. मात्र त्याचे आरोपी पोलिसांना मिळू शकलेले नाहीत. शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.