धावत्या रेल्वेसमोर दोन मित्रांनी घेतली उडी; मृतदेह पाहताच कुटुंबियांवर कोसळलं आभाळ

Chhatrapati Sambhaji Nagar Crime :  छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्‍यरात्रीनंतर दोघांनी सोबतच धावत्‍या रेल्‍वेसमोर उडी मारत जीवनयात्रा संपवली  आहे. मुकुंदवाडी भागातील रेल्वे रुळावर  सकाळी दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत.

आकाश नेटके | Updated: Jul 18, 2023, 12:03 PM IST
धावत्या रेल्वेसमोर दोन मित्रांनी घेतली उडी; मृतदेह पाहताच कुटुंबियांवर कोसळलं आभाळ title=

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमधून (chhatrapati sambhaji nagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर दोन सख्ख्या मित्रांनी एकत्रच मृत्यूला कवटाळलं आहे. धावत्या रेल्वेखाली उडी घेत दोघांनाही स्वतःला संपवलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (chhatrapati sambhaji nagar Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी त्यांच्या मृत्यून खळबळ उडाली आहे

विशाल देविदास दाभाडे ( 20 वर्ष रा. विश्रांती नगर गल्ली नंबर 04 छत्रपती संभाजीनगर ) आणि अनिल दादाराव आव्हाड ( 30 वर्ष रा. भारत नगर छत्रपती संभाजीनगर ) असे मृतांची नावे आहेत. मुकुंदवाडी भागातील रेल्वे रुळावर आज सकाळी दोघांचे मृतदेह आढळले होते. सकाळी काही स्थानिक रेल्वे रुळाजवळून जात असताना दोघांचे मृतदेह आढळले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरु केला. स्थानिकांनी हे मृतदेह विशाल, अनिलचे असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधत याबाबत माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. दोघांच्या कुटुंबियांनीही रुग्णालयात पोहोचत मृतदेहाची ओळख पटवली आहे. दोघांचे छिन्नविछिन्न मृतदेह पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकली आहे. दुसरीकडे दोघांच्याही एकत्र आत्महत्या करण्याचे कारण मात्र अजून समोर आलेले नाही. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. 

दरम्यान, विशाल व अनिल हे दोघेही मित्र मजूरी काम करत होते. काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री बराच वेळ हे दोघंही एकमेकांसोबतच होते. मात्र, सकाळी त्यांचे मृतदेहच सापडले.