सलग 4 वेळा खासदार, 5 व्या वेळी पराभव! आता सहाव्या निवडणुकीत खासदार होतील का चंद्रकांत खैरे?

Chhatrapti Sambhajinagar Loksabha : अंबादास दानवे यांनी डावलून उद्धव ठाकरे शिवसेनेने छत्रपची संभाजीनगरची उमेदवारी चंद्रकांत खैरे यांना दिलीय. सलग 4 वेळा खासदार, 5 व्या वेळी पराभव आता या संधीचं खैरे सोनं करु शकतील का? 

नेहा चौधरी | Updated: Mar 27, 2024, 01:14 PM IST
सलग 4 वेळा खासदार, 5 व्या वेळी पराभव! आता सहाव्या निवडणुकीत खासदार होतील का चंद्रकांत खैरे? title=
Chhatrapati Sambhajinagar LokSabha Election 2024 Chandrakant Khaire Profile in Mararhi

Chandrakant Khaire Profile in Mararhi : अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाची लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये इच्छुक अंबादास दानवेचा पत्ता कट होत चंद्रकांत खैरेला उमेदवारी देण्यात आली आहे. सलग 4 वेळा खासदार, 5 व्या वेळी पराभवानंतर खैरेंना शिवसेनेकडून पुन्हा संधी दिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. चार हजार 234 मतांनी त्यांना हार पत्करावी लागली होती. 

शिवसेनेचा शिलेदार यंदाही राखेला गड!

हिंदू मुस्लिम तणावाची पार्श्वभूमी असलेल्या या मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर जे पूर्वीचं होतं औरंगाबाद. या शहरात शिवसेनेला घवघवीत यश मिळवून दिलं ते बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक चंद्रकांत खैरे यांनी. 
स्वातंत्र्यसैनिकाच्या घरात जन्म, पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन डेक्कन फ्लोअर मिलमध्ये सुपरवायझर काम ते करायचे. पण त्यांना राजकारणाची आवडत त्यात ते कट्टर हिंदुत्व होते. अशात मग मराठवाड्यातील पहिली शिवसेना शाखा स्थापन करण्यासाठी त्यांनी मौलाचा वाटा उचलला. 1988 मध्ये शिवसेनेने पहिल्यांदा महापालिका निवडणूक लढवली नगरसेवक पदाची जबाबदारी स्विकारली. 

शिवसेनेतून पदाधिकारी म्हणून काम पाहत असताना लोकनेता म्हणून त्यांनी दोन वेळा विधानसभा जिंकली. पहिला हिंदू आमदार म्हणून त्यांनी मान मिळवला. त्यानंतर 1995-99 च्या युती सरकारमध्ये त्यांनी गृहनिर्माण, वने व पर्यावरण, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिलं. मग त्यांनी कधी मागे पाहिलं नाही शिवसेनेच्या या हिऱ्याने सलग 1999 ते 2014 असे चार वेळा खासदारकी पटकवली. 

2005 ते 2018 या दरम्यान त्यांच्या मानात अजून भर पडली. मराठवाड्यातील लातूर, धाराशीव, बीड या जिल्ह्यांतील संघटनात्मक बांधणीची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. 2018 मध्ये त्यांचं काम आणि लोकप्रियता पाहता उपनेतेपदावरुन त्यांना नेतेपद देण्यात आलं. 

कपाळी केशरी टिळा, गळ्यात भगवा रुमाल, छातीवर धनुष्यबाणाचे चिन्ह घेऊन दिल्लीतील सभागृह त्यांनी गाजवली. बाळासाहेबांच्या निधनानंतर 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पराभवाना शिवसेनेला धक्का बसला. पण संभाजीनगरमधील त्यांच्या वावर अजून ते विद्यमान खासदार आहे असाच असतो. तगडा जनसंपर्क, एका फोनवर लोकांसाठी धावून जाणं, त्यांच्या संभाजीनगरमध्ये दरारा आजही कायम आहे. 

त्यांच्या सामाजिक कामाबद्दल बोलायचं झालं तर ते मुळातच धार्मिक असल्याने त्यांच्या दारात गेल्या कधीही रित्या हाताने परत नाही. दिल्लीत यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचं दिल्लीतील बंगला हे अजून सर्वस्व. अन्न, निवासाची तिथे निशुक्ल सोय करण्यात येतं. खरं तर मराठवाड्यातील लोकांनी इतर राज्यातून त्यांना मदतीची हाक मारल्यावर ते मदत करण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. 

एकनाश शिंदेने शिवसेनेत फुटतीचं वादळ आणलं पण ते चंद्रकांत खैरेने काय आपल्यासोबत घेऊन जाऊ शकलं नाही. हीच त्यांची एकनिष्ठता आणि संभाजीनगरमधील त्यांचा औरा पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांना सहाव्यांदा उमेदवारी दिली आहे, असं म्हणं वावग ठरणार नाही.