Ajit Pawar : अनाथांचा नाथ एकनाथ... अजित पवार यांच्या रॅलीमध्ये वाजले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाणं

पुण्यातल्या कसबा मतदारसंघात अजित पवारांचा (Ajit Pawar) रोड शोदरम्यान मुख्यमंत्री शिंदेंचे कार्यकर्ते आणि मविआचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यानंतर अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाणे वाजले. यामुळे कार्यकर्ते गडबडले.  

Updated: Feb 20, 2023, 10:19 PM IST
Ajit Pawar :  अनाथांचा नाथ एकनाथ... अजित पवार यांच्या रॅलीमध्ये वाजले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाणं title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Pune Kasba by Election) विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) प्रचाराच्या मैदानात उतरले. अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Congress leader Balasaheb Thorat) यांनी रोड शो केला.  महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धांगेकर (Mahavikas Aghadi candidate Ravindra Dhangekar)  यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी  महाविकास आघाडी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. मात्र, या कार्यक्रमात एक गोंधळ झाला. अजित पवार यांच्या रॅलीमध्ये वाजले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाणे वाजले. यामुळे कार्यकर्ते गडबडले (Maharashtra Politics). 

विरोधी पक्षनेते अजित पवारांची काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी सुरू असलेली प्रचाराची रॅली ही त्याच मार्गावरून गेली ज्या मार्गावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी पुण्यातील शिवसैनिकांनी ढोल ताशा तसेच डीजेचे आयोजन केलेलं होतं. परंतु अजित पवार यांची रॅली त्या कार्यक्रमास्थळी पोहोचतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

या घोषणाबाजीला प्रतिउत्तर म्हणून शिवसैनिकांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केल्या केली. ही घोषणाबाजी सुरू होताच काही वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असणार ''अनाथांचा नाथ एकनाथ...'' हे गाणं डीजे वर वाजायला सुरुवात झाली त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र चांगले संतप्त झाले. 

ही सगळी परिस्थिती पाहता अजित पवार यांनी त्यांच्या चार चाकी जीप मधून उतरून खाली चालत जाण्याचा निर्णय घेतला आणि ते काही अंतर पायी चालत गेले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने 

पुण्यातल्या कसबा मतदारसंघात अजित पवारांच्या रोड शोदरम्यान मुख्यमंत्री शिंदेंचे कार्यकर्ते आणि मविआचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यामुळे जोरदार घोषणाबाजी रंगली. रोडशो शिंदे बैठक घेत असलेल्या कार्यालयाच्या समोरून जात असताना हा प्रकार घडला. मविआ कार्यकर्त्यांनी शिंदेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.