Uddhav Thackeray | नितीन गडकरींच्या लेटर बॉम्बवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (union minister nitin gadkari) यांच्या लेटर बॉम्बवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.   

Updated: Aug 20, 2021, 02:55 PM IST
Uddhav Thackeray | नितीन गडकरींच्या लेटर बॉम्बवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून स्थानिक शिवसैनिक आणि लोकप्रतिनिधी विकासकामात अडथळा आणत असल्याची तक्रार केली. या लेटर बॉम्बवरुन राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिवसेनेचे कान टोचले. दरम्यान या लेटर बॉम्बवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (chief minister uddhav thackeray first reaction union minister nitin gadkari letter bomb)

उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

"नितीनजी तुम्ही गोष्टी तर खूप प्रेमाने करतात मात्र पत्र कठोर लिहितात. मी तुम्हाला शब्द देतो की कोणालाही विकासाच्या आड येऊ देणार नाही", अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी गडकरी यांना दिली. उपराजधानी नागपूरमध्ये मेट्रोच्या (Nagpur Metro Rail Projects) सिताबर्डी ते कस्तुरचंद्र पार्क या मार्गाचं (Sitabuldi- Zero Mile Freedom Park Kasturchand Park Section)  तसेच फ्रीडम पार्कचं (Freedom Park) उद्घाटन केलं गेलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती दर्शवली. यावेळेस त्यांनी गडकरींच्या लेटर बॉम्बवर ही प्रतिक्रिया दिली.