मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर

Marathwada Liberation Day : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. ते मुंबईतून औरंगाबाद दौऱ्यासाठी ते रवाना झाले आहेत.  

Updated: Sep 17, 2021, 07:37 AM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर title=
Pic Courtesy : twitter

मुंबई : Marathwada Liberation Day : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. ते मुंबईतून औरंगाबाद दौऱ्यासाठी ते रवाना झाले आहेत.  या दौऱ्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुताम्यांना अभिवादन ते करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 7.30 वाजता मुंबईहून विमानाने औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. सकाळी 8.25 वाजता त्यांचे चिकलठाणा विमानतळ येथे आगमन होणार आहे. सकाळी 8.45 वाजता मुख्यमंत्री हे सिद्धार्थ उद्यान येथे स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्तीसंग्रामातील हुताम्यांना अभिवादन करतील. त्यानंतर सकाळी 9 वाजता त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सकाळी 9.30 वाजता मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते जिल्हा परिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि पैठण येथील संतपीठाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री सकाळी 10.40 वाजता शेंद्रा येथील ऑरिक सिटी आणि डीएमआयसी अंतर्गतच्या विविध कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता ते चिकलठाणा विमानतळ येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत.