व्हॉट्सअॅप महत्त्वाचं की मुल, धक्कादायक प्रकार आला समोर

धक्कादायक प्रकार आला समोर

Updated: Jul 5, 2018, 03:12 PM IST
व्हॉट्सअॅप महत्त्वाचं की मुल, धक्कादायक प्रकार आला समोर title=

औरंगाबाद : दोन ते तीन वर्षांच्या एका चिमुरडीला तिच्या आईनंच चालत्या ट्रेनमध्ये पाय बाहेर काढून बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आणखी धक्कादायक म्हणजे, मुलीला अशा पद्धतीनं बसवून तिची आई व्हॉटसअपवर चॅटींग करण्यात गुंतलेली होती. ट्रेनमधल्या सहप्रवाशांनी या मुलीच्या आईला मुलीला नीट बसवायला सांगितलं. तरी या मुलीच्या आईनं त्याकडे दुर्लक्ष केलं. औरंगाबाद रेल्वे स्थानकावरचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

नांदेड-मुंबई या तपोवन एक्स्प्रेसमधल्या D-4 या कोचमधून एका महिला कल्याणला जात होती. तिच्यासोबत तिची लहान मुलगी होती. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.  भारतीय रेल्वे सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी या मुलीला पाहिलं आणि तिच्या आईला हटकलं. तेव्हा तिच्या आईनं मुलीचे पाय आत घेतले.

पाहा व्हिडिओ