चिपी विमानतळ उद्घाटन : मुख्यमंत्र्यांच्या शेजारी राणे, व्यासपिठावर आणखी कोण?

Chipi Airport Inauguration: चिपी विमानतळाचा (Chipi Airport) लोकार्पण सोहळा आज दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.  

Updated: Oct 9, 2021, 12:20 PM IST
चिपी विमानतळ उद्घाटन : मुख्यमंत्र्यांच्या शेजारी राणे, व्यासपिठावर आणखी कोण? title=
संग्रहित छाया

मुंबई, सिंधुदुर्ग : Chipi Airport Inauguration: चिपी विमानतळाचा (Chipi Airport) लोकार्पण सोहळा आज दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उजव्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane) यांची खूर्ची तर डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची खूर्ची असणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे आणि राणे तब्बल चार वर्षानंतर एकाच व्यासपीठावर येत आहेत. त्यामुळे हे दोन्ही प्रमुख नेते मंडळी काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - नारायण राणे आज एकाच मंचावर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आयआरबी, एमआयडीसी विभागाने उद्घाटनाची जय्यत तयारी केली आहे.

चिपी विमानतळ उद्घाटन : मुख्यमंत्र्यांच्या शेजारी राणे, व्यासपिठावर आणखी कोण असणार?

दरम्यान, मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच वेळी दाखल झालेत. मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच विमानाने सिंधुदुर्गकडे रवाना झालेत. तर नारायण राणे ज्या विमानातून सिंधुदुर्गकडे येत आहेत. त्याच विमानात शिवसेनेचे नेतेही आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, कृषीमंत्री दादाजी भुसे, खासदार अरविंद सावंत, आमदार दीपक केसरकर, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे आदी नेतेमंडळी आहे. तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडेही आहेत. 

काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. त्याचवेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागतच करणार आहोत. मुख्यमंत्री शेजारी असणे हा चांगला क्षण आहे. चिपी विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले आहे.

राणे यांनी यावेळी निमंत्रण पत्रिकेत लहान अक्षरात नाव असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने भाजपकडून नाराजी व्यक्त केली. तसेच दरेकर यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.