close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नवी मुंबईत मेट्रोची पहिली चाचणी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणार तालीम

 नवी मुंबईकरांचे मेट्रोचं स्वप्न लवकरच साकारणार आहे.  

Updated: Sep 11, 2019, 08:16 AM IST
नवी मुंबईत मेट्रोची पहिली चाचणी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणार तालीम

नवी मुंबई : नवी मुंबईकरांचे मेट्रोचं स्वप्न लवकरच साकारणार आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोची पहिली चाचणी घेण्यात येणार आहे. मेट्रो कारशेड ते पेंधर स्थानकापर्यंत मेट्रो धावणार आहे. 

मेट्रोतून प्रवास करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्न आता लवकरच प्रत्यक्षात साकार होणार आहे. आवश्यक त्या तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो मेट्रोची प्रथमच रंगीत तालीम घेतली जाणार आहे.

मेट्रो कारशेडपासून ते पेंधर स्थानकापर्यंत ही चाचणी होईल. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी मुंबई मेट्रोची रंगीत तालीम घेण्याचा निर्धार सिडकोने केला होता. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री नवी मुंबई मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.