जुलै महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार?

मुख्यमंत्री म्हणतात...

Updated: Jul 14, 2020, 08:41 PM IST
जुलै महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार?
संग्रहित छायाचित्र

मुंबई : यंदाच्या वर्षी बकरी ईद साजरा करतेवेळी मुस्लीम बंधवांना काही महत्त्वाच्या नियमांचं पालन करण्यासंबंधीचं आवाहन मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. ऑनलाईन बैठकीत त्यांनी याबाबतचं आवाहन केलं. याचवेळी त्यांनी राज्यातील आणि देशातील कोरोना परिस्थितीबाबत एक सूचक आणि आशावादी विधानही केलं. 

मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार सध्या कोरोना रुग्णांचा आकडा अतिशय झपाट्यानं वाढत असला तरीही जुलै महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अपेक्षित वेळी कोरोना संसर्गाचा कमी न झाल्यास त्याचा आणि ऑगस्ट महिन्य़ात हा आलेख वर गेल्यास मात्र हा आलेख वर गेल्यास परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं कठीण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळं उदभवलेली आव्हानात्मक परिस्थिती पाहता अनेक यंत्रणा दिवसरात्र एक करत कामाला लागल्या आहेत. असंख्य कर्मचारी खऱ्या अर्थानं खासगी जीवन आणि सुरक्षिततेला दूर सारत कोरोना बाधितांसाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. अशा सर्व यंत्रणांवरील ताण आता वाढत चालला असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती सर्वांपर्यंत पोहोचवली.

 

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आशा पाहता आता कोरोनाचा फैलाव नियंत्रणात येऊन किमान काही अंशी ही संकटाची परिस्थिती आटोक्यात येते का, हे येत्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होणार आहे.