मुंबई : महाविकास आघाडी सरकारला राज्यातील सत्तेवर येऊन 28 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर सामना या शिवसेनेचं मुखपत्राचे संपादक आणि शिवसेा नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत घेतली. राऊतांच्या अनेक प्रश्चांची उत्तरं देत आणि राज्याच्या पुढील वाटचालीबाबत वक्तव्य करत विरोधकांनाही खडे बोल सुनावले आहेत.
महाराष्ट्रात मागील काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांचा आधार घेत विरोधकांनी महाविकासआघाडी सरकारच्या राज्यात महाराष्ट्रामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले होत असल्याचा आरोप केला होता. या प्रश्नावर उत्तर देत मराठी महाराष्ट्रात गाडून त्यावर तुम्ही नाचणार आणि ते आम्ही उघड्या डोळ्यांनी सहन करु? असा प्रतिप्रश्न केला.
महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले?
second promo pic.twitter.com/EMKyjB3SNy— Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2020
वाढीव वीजबिल आणि शरद पवारांबाबतचं मत या मुद्द्यांवरही या मुलाखतीतून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. राऊतांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही उत्तरं विरोधकांना उद्देशून आहेतच शिवाय महाविकास आघाडी सरकारच्या बाबतीत जनतेच्या मनातील बऱ्याच प्रश्नांचीही उत्तरं देणारी ठरत आहे.