पश्चिम विदर्भात हुडहुडी; अमरावतीत सर्वात कमी तापमान

 अमरावतीत सर्वात कमी तापमानाची नोंद (lowest temperature in Amravati) करण्यात आली आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ या ठिकाणी तापमान १० अंश सेल्सियसच्या खाली गेले आहे.

Updated: Dec 22, 2020, 11:36 AM IST
पश्चिम विदर्भात हुडहुडी; अमरावतीत सर्वात कमी तापमान  title=
कानपूर शहरात थंडी वाढल्याने मजुरांनी शेकीटी पेटवली. Pic Courtesy: ANI

अमरावती : मागील आठवड्यात असलेले ढगाळ वातावरण कमी झाल्यानंतर आता विदर्भासह राज्यातील तापमानात घट होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. जमिनीच्या पृष्ठभागाजवळून वाहणारे वारे, उत्तरेकडून वाहत असल्यामुळे, पश्चिम विदर्भात आणखी थंडी वाढण्याचा  (Cold in West Vidarbha) अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पश्चिम विदर्भात हु़डहुडी दिसून येत आहे. अमरावतीत सर्वात कमी तापमानाची नोंद (lowest temperature in Amravati) करण्यात आली आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ या ठिकाणी तापमान १० अंश सेल्सियसच्या खाली गेले आहे.

पश्चिम विदर्भात पुढील तीन दिवसात किमान तापमान २ ते ४ अंश सेल्सियसने घसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमरावतीत तापमान सहा अंश सेल्सियस होते. त्यामुळे पश्चिम विदर्भात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भाला मध्यप्रदेश लागून असल्याने उत्तरेकडील भागात तुरळक ठिकाणी दाट धुक्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा अंदाज अमरावतीच्या शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला आहे. 

सध्या कडाक्याची थंडी पडत असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरबरा पिकाला पोषण आहे. तर थंडीची तीव्रता वाढल्यास तूर पिकाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या थंडी असल्याने सकाळी फिरायला जाणाऱ्याच्या संख्येत घट झाली असून राज्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकानी शेकोट्या पेटल्या आहे.

पश्चिम विदर्भातील तापमान

अमरावती : ६ अंश सेल्सियस

अकोला : ९.६ अंश सेल्सियस

वाशीम : १०.२ अंश सेल्सियस

बुलढाणा : ११ अंश सेल्सियस

यवतमाळ : ८.५ अंश सेल्सियस

पुण्यात ग्रामीण भागात थंडी

पुणे (Pune) जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही तापमानाचा पारा घसरला असून थंडीची हुडहुडी वाढले आहे. ग्रामीण भागात तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून नागरिक ठिक ठिकाणी शेकोटी करून शेकताना दिसत आहेत. तापमानाचा घसरलेला पारा हा मात्र कांदा, गहू, ज्वारी यांसारख्या पिकांसाठी पोषक ठरणार आहे.