पालिकेच्या बसची कारला धडक, कारची अवस्था पाहून चालक संतापला, थेट तलवार काढली अन्...

Navi Mumbai Accident News Today: नवी मुंबईत झालेल्या एका अपघातानंतर काही वेळ वेगळाच ड्रामा रंगला होता. तरुणाने कारमधून तलवार काढून सपासप वार केल्याचे समोर आले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 5, 2023, 12:48 PM IST
पालिकेच्या बसची कारला धडक, कारची अवस्था पाहून चालक संतापला, थेट तलवार काढली अन्... title=
collision between nmmt bus and private vehical driver attack on bus with sword

स्वाती नाईक, झी मीडिया

Navi Mumbai Accident: नवी मुंबईत (Navi Mumbai) एक धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे. अपघातानंतर कार चालकाने थेट बसवरच तलवारीने हल्ला चढवला आहे. या घटनेने परिसरात काही वेळ तणाव पसरला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रकरण हाताळले आहे. याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. (Navi Mumbai Bus Car Accident)

महापालिकेच्या बसची खासगी कारला धडक

सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या उरण-कोपरखैरणे बसने कारला धडक दिली. या अपघातात कारचे थोडे नुकसान झाले होते. कारला धडक बसल्यानंतर कारचालक सनी लांबा यांने सांतापून बसवर हल्ला केला. 

भररस्त्यात निर्माण झाला वाद

सनी लांबा याने कारमधून तलवार बाहेर काढून बस चालकाला शिवीगाळ करत बसवर वार करत राहिला होता. या घटनेमुळं बसमधील प्रवासी ही काही काळासाठी भयभयीत झाले होते. तर, आरोपी सनी लांबा हा रस्त्याच्या मधोमधच बस थांबवून चालकासोबत वाद घातल होता. 

कार चालकाने थेट तलवारच काढली

घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर पोलिसांनी कार चालक सनी लांबा याला ताब्यात घेतले आहे. मात्र, या घटनेमुळं काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. 

पोलिसांनी घेतले ताब्यात

दरम्यान, पुढील गाडी रस्ता ओलांडत असताना अचानक बसने ब्रेक मारल्याने खासगी कार बसला मागून धडकली. त्यामुळं कारच्या पुढील भागाचे थोडे नुकसान झाले आहे. त्यामुळं कार चालक सनी लांबा यांने रागाच्या भरात कारमधून तलवार बाहेर काढत बस चालकाला धमकावले व बसवर सपासप तलवारचे वार करत बस थांबून धरली. तर, बस चालकालाही शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात सनी लांबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नवी मुंबईत मराठा आरक्षणाचे पडसाद

दरम्यान, जालन्यातील मराठा आंदोलनाचे पडसाद नवी मुंबईतही पडू लागले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन नवी मुंबईत रास्ता रोको करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळं काही वेळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.