राफेल विमान खरेदीप्रकरणी काँग्रेस आक्रमक, नागपुरात निदर्शने

राफेल विमान खरेदीप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात हल्ला आणखी तीव्र केला आहे.

Updated: Sep 12, 2018, 07:47 PM IST
राफेल विमान खरेदीप्रकरणी काँग्रेस आक्रमक, नागपुरात निदर्शने

नागपूर : राफेल विमान खरेदीप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात हल्ला आणखी तीव्र केला आहे. मोदी सरकारनं राफेल खेरदीत घोटाळा केल्याचा आरोप करत आज काँग्रेसनं नागपुरात संविधान चौकात तीव्र निदर्शने केली. 

काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राफेल घोटाळ्यावरून मोदी सरकारविरोधात जोरदार निदर्शनं केली.याप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही काँग्रेस नेत्यांनी केली.