बीड : राज्यसभा खासदार आणि काँग्रेसच्या नेत्या रजनी पाटील यांचे पुत्र तसंच केज नगरपंचायतचे नगराध्यक्ष आदित्य पाटील यांच्यावर अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
रस्त्याच्या कामात अपहार केल्याचा आरोपावरून न्यायालयाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. केज इथल्या नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक १२ मधील रस्ता, नाल्यासाठी आलेला सुमारे साडेसात लाखांचा निधी हडप केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
राष्ट्रवादीच्या नगरसेविका मालती गुंड यांनी फिर्याद दिली होती. मात्र गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीअंती गुन्हा दाखल झाला.