भिवंडी मनपा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा

सुरुवातीला काँग्रेसला जबरदस्त टक्कर देणारा भाजप आता भिवंडीत मागे पडू लागला आहे. ताज्या आकडेवारीनुसार २२ ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला आहे २० उमेदवार आघाडीवर आहे. तर भाजपते ९ उमेदवार विजयी झाले असून ७ उमेदवार आघाडीवर आहेत.

Updated: May 26, 2017, 02:17 PM IST
भिवंडी मनपा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा title=

भिवंडी : सुरुवातीला काँग्रेसला जबरदस्त टक्कर देणारा भाजप आता भिवंडीत मागे पडू लागला आहे. ताज्या आकडेवारीनुसार २२ ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला आहे २० उमेदवार आघाडीवर आहे. तर भाजपते ९ उमेदवार विजयी झाले असून ७ उमेदवार आघाडीवर आहेत.

तिकडे शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारत, 11 जागांवर आघाडी घेतली आहे. तर कोणार्क आघाडीचे ४ जण विजयी झाले आहेत. तर रिपाईचे चार आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. समाजवादी पक्षाचे २ उमेदवार देखील विजयी झाले आहेत.