सहकारी साखर कारखान्यांना मिळणार ५ टक्के अतिरिक्त उचल

गेल्यावर्षी राज्यात 105 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं होतं.

Updated: Apr 17, 2018, 07:40 PM IST
सहकारी साखर कारखान्यांना मिळणार ५ टक्के अतिरिक्त उचल title=

मुंबई : राज्यात यंदा १२५  लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होणार असून या पार्श्वभूमीवर सहकारी साखर कारखान्यांना ५ टक्के अतिरिक्त  उचल देण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. यंदा साखरेच्या उत्पादनात  वाढ होणार असल्यामुळं सहकारी कारखान्यांसमोर एफआरपी देण्याचं संकट उभं ठाकणार आहे. या पार्श्वभूमीवर ५ टक्के अतिरिक्त उचल देण्याचा आदेश सहकारी बँकांना देण्यात आले आहेत. गेल्यावर्षी राज्यात 105 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं होतं.

साखर कारखान्यांवर साखर जप्तीची नामुष्की

दरम्यान, सांगली आणि कोल्हापुरातल्या  पाच साखर कारखान्यांवर साखर जप्तीची नामुष्की ओढवली आहे. एफआरपीची रक्कम दिली नसल्याने साखर आयुक्तांनी जोरदाण दणका देताना  जप्तीचे आदेश दिले आहेत.

आयुक्तांच्या आदेशाने खळबळ

 कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणा, भोगावती, पंचगंगा आणि सांगली जिल्ह्यातील माणगंगा आणि महाकाली या पाच सारख कारखान्यांची साखर जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. साखर आयुक्तांनी काढलेल्या या आदेशांनी एकच खळबळ उडालीय. एफआरपीची रक्कम वेळेत दिली नसल्यानं ही कारवाई करण्यात आलीय.