योगेश खरे, नाशिक : कोरोना काळात (CoronaVirus) महाराष्ट्रातील ( Maharashtra) अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर कोणाचे व्यवसाय बुडाले. यामुळे अनेकांनी नैराश्यापोटी आत्महत्याही केल्या. मात्र याच कोरोनामुळे नाशिकमधील (Nashik) दोन कलाकारांना काम मिळत नसल्याने छोटेखानी न्याहारी सेंटर सुरू करत व्यवसाय सुरू केला.
या न्याहरी सेंटरवर काम करणारी तरुणी आहे शुभांगी सदावर्ते. 'देव बाबळे' या प्रसिद्ध संगीत नाटकांमध्ये मुख्य भूमिकेत काम करणारी ही नायिका. आज नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये स्वतः पोहे उपमा आणि थालीपीठ बनवून नाशिककरांच्या सकाळची भूक भागवतेय. तिचे पती आनंद ओक सुद्धा संगीतकार असून नाट्य व्यवसायात संगीत देण्याचे काम करतात इतकच नाही तर त्यांचा रेकॉर्डिंग स्टुडिओ सुद्धा आहे. मात्र एकूणच धोरणाचा फटका मनोरंजन क्षेत्राला बसल्याने या दोघांनीही कँनडा कॉर्नर परिसरातील न्याहारी नास्ता सेंटर सुरू केलंय ,
जुलै महिन्यात हे दोघे विविह बंधनात अडकले. आता खर्चही वाढला होता. मोदक, दिवाळी फराळ, तयार पीठ विकल्यानंतर अजून काही करण्याची मनात जिद्द होती. कारण कोरोना ची साथ अजून किती दिवस चालेल हे माहीत नाही. त्यानंतर ही आपल्याला काम मिळेल की नाही याचीही शाश्वती नाही. तर कोरोनामुळे 500 रुपये तासाने काम करणारा 25 रुपये प्लेट पोहे विकण्यास भाग पडले आहे हे लक्षात आले आहे. त्यामुळे खवय्या नाशिककरांना घरचा नाश्ता सकाळी सकाळी उपलब्ध होतो.
कोरोनामुळे या दाम्पत्याला हे लक्षात आले की कोणत्याही एका क्षेत्रावर अवलंबून राहणे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांनी पुढची गरज ओळखून हा नवीन व्यवसाय सुरू केलाय.त्यांच्या ह्या अनुभवातून त्यांनी आपल्यातले गुण ओळखून कमी गुंतवणुकीत छोट्या व्यवसायाचं पाऊल उचलण्याचा सल्ला सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे. आता करूनच या दुसऱ्या लाटेतही अनेकांना फटका बसू शकतो. त्यामुळे दुसरा व्यवसाय करण्याचा विचार तुम्हीही करण्यास हरकत नाही.