चिंताजनक | दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

 जगावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका घोंगावत असताना राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Updated: Nov 28, 2021, 10:45 PM IST
 चिंताजनक | दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

आतिष भोईर, झी मीडिया, डोंबिवली : जगावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका घोंगावत असताना राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. दक्षिण अफ्रिकेतील (South Africa) केपटाऊनमधून डोंबिवलीत (Dombivli) आलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य विभागाने (Health Department) केलेल्या तपासणीत स्पष्ट झालं आहे. (Corona infection in a passenger from who come to South Africa to Dombivli)

या रुग्णाचे नमुने हे मुंबईत जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येणार आहेत. या नमुन्यातून त्या कोरोनाबाधित प्रवाशीला ओ मायक्रोनची लागण झाली आहे, हे रिपोर्ट आल्यानंतर समजेल. सध्या या रुग्णाला पालिकेच्या विलिगिकरण कक्षात ठेवलं आहे. सुदैवाने या कोरोनाबाधित व्यक्तीच्या भावाचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. 

आता कुटुंबातील उर्वरित सदस्यांची चाचणी ही सोमवारी 29 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी प्रतिभा पाटील यांनी दिली.  दरम्यान या सर्व प्रकारामुळे आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये भितीचं वातावरण तयार झालं आहे.