कोरोनाचा कहर : राज्यात 66 हजार 159 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ  

Updated: Apr 29, 2021, 09:27 PM IST
कोरोनाचा कहर : राज्यात 66 हजार 159 नव्या कोरोना रूग्णांची नोंद  title=

मुंबई : राज्यात 24 तासांत 66 हजार 159 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 771 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 लाख 70 हजार 301 रूग्णांवर उपचार सुरू आहे. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून. प्रत्येकाने खबरदारी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे.

तर मुंबईत आज 4 हजार 192 नव्या कोरोना  रूग्णांची नोंद झाली आहे.  धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासांत तब्बल 82 जणांचा बळी गेला आहे. तर 64 हजार 18 रूग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबईत देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वातावरण चिंता वाढवणारं आहे.  

कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 835 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 12 हजार 734 आहे. तर एका दिवसांत 1 हजार 546 कोरोना बाधित रुग्णांना डीचार्ज मिळालेला आहे. गेल्या 24 तासांत 10 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 जळगावमध्ये देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात आज 1 हजार 63 कोरोना बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 120997 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 108129 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत  21 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.