कोरोनाचे साईड इफेक्ट : बापरे ! चक्क डोळे, हिरड्यासह दात काढण्याची वेळ

कोरोनाची स्थिती येथे वाईट आहे. ( Coronavirus in Nashik) रेमडेसिवीर औषधाबरोबर  ऑक्शिजनचा तुडवडा जाणवत आहे. कोरोनातून ( Coronavirus) बरे होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या औषधाचे साईट इफेक्ट दिसून येत आहेत.

Updated: May 3, 2021, 03:35 PM IST
कोरोनाचे साईड इफेक्ट : बापरे ! चक्क डोळे, हिरड्यासह दात काढण्याची वेळ

योगेश खरे / नाशिक : कोरोनाची स्थिती येथे वाईट आहे. ( Coronavirus in Nashik) रेमडेसिवीर औषधाबरोबर  ऑक्शिजनचा तुडवडा जाणवत आहे. कोरोनातून ( Coronavirus) बरे होण्यासाठी घेण्यात येणारी औषध स्टेरॉइड्स रुग्णांचे नाशिकमध्ये म्युकर मायकोसिसमुळे चक्क डोळे आणि हिरड्या सह दात काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोनाचे साईड इफेक्ट (Corona side effects) नाशिक शहरात (Nashik) चांगलीच भीती पसरली आहे

 कोरोनातून बरे होण्यासाठी रेमदेसिविर ची मोठी मागणी सध्या राज्यामध्ये आहे मात्र हेच रेम डीसी वर औषध चेहरा विद्रूप करण्यास कारणीभूत ठरत आहे नाशिक शहरात याचा वापर केलेला रुग्णांमध्ये म्युकरमायक्कोसिस या बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे विशेष म्हणजे यामुळे नाक कान घसा आणि डोळेही जाण्याचा धोका संभवतोय. नाशिक शहरातील चार रुग्णांचे यामुळे डोळे गेले आहेत तर आठ जणांच्या दातांच्या हिरड्या काढण्याची वेळ आली आहे.

या आजारावर लागणारे औषध महागडे आहे आणि दुर्दैवाने त्यांचा तुटवडा सुद्धा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे अर्थातच या तुटवड्यामुळे हा आजार संपूर्ण राज्यात फैलाव आल्याचं समोर येत आहे. या बाबतीमध्ये रुग्णांनी स्वतः काळजी घेतल्यास हा आजार दूर होण्यास मदत होऊ शकते, असे नाक कान घसा तज्ज्ञ डॉक्टर उमेश तोरणे यांनी म्हटले आहे.

या  आजारांची लक्षणं  दुसऱ्या आणि तिसऱ्या म्यूटंटमध्ये अधिक आढळून येत आहेत. याच विशेषता ऑक्सिजनवर असलेले पेशंट हाय स्टेरोईड्स आणि अँटिबायोटिक घेत असलेले पेशंट याला बळी पडत आहेत. संशोधक हे नेमके कशामुळे होते याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्यालाही कोरोना झाला असेल आणि बरे झाले असाल तर आपल्याला ही लक्षणे नाही ना याकडे लक्ष द्या, तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत.