Corona टेस्ट कर्मचारी आणि कामगारांसाठी बंधनकारक, सेंटरबाहेर मोठ्या रांगा

कोरोना टेस्टसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा

Updated: Apr 9, 2021, 01:56 PM IST
Corona टेस्ट कर्मचारी आणि कामगारांसाठी बंधनकारक, सेंटरबाहेर मोठ्या रांगा title=

आतिष भोईर, कल्याण : कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असून दिवसाला जवळपास दीड हजार रुग्णांची वाढ होता आहे. वाढत्या प्रादूर्भावच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने टेस्टिंग वाढवल्या आहेत. त्यातच शासनाच्या नवीन निर्बंधानुसार दुकानात, अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी, रिक्षा चालक, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या व्यक्ती, तसेच खाजगी कंपनीत काम करणाऱ्या लोकांना ही कोरोना टेस्ट बंधनकारण केल्याने टेस्टिंग सेंटरबाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. 

टेस्टिंग बंधकाकरक केल्याने टेस्टिंगच्या आकडेवारीत देखील वाढ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये पालिकेसह खाजगी टेस्टिंग सेंटरमध्ये सकाळपासूनच रांगा दिसून आल्या. केडीएमसीमध्ये दरदिवशी सुमारे 5 हजार टेस्टिंग होत असून टेस्टिंग आणखी वाढवण्यात येणार आहेत.

तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था, कार्यालये, हॉटेल, दुकानांसह खासगी आस्थापना, इ-कॉमर्स, खासगी वाहनचालक, अन्य कर्मचारी, शिक्षक, कर्मचारी, बांधकाम कामगार, वृत्तपत्र वितरण करणारे कर्मचारी, मंगल कार्यालयातील कर्मचारी, उत्पादन क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या लवकरात लवकर लसीकरण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. लसीकरण झालं नसल्यास त्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आले आहे. 

लसीकरण न झालेले कर्मचारी आणि कामगारांना 15 दिवसांची वैधता असलेले आरटीपीसीआर या कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे अनिवार्य असणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार तर, संबंधित आस्थापनांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. या निर्णयाची येत्या 10 एप्रिलपासून अंमलबजावणी केली जाणार आहे.