नाशिक : Coronavirus in Nashik : कोरोनाचा धोका लक्षात घेता आता मुंबईनंतर नाशिक शहरात आजपासून 15 दिवस जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. गणपती उत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोका टाळण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.
नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार नाशिक शहरात आजपासून पुढील 15 दिवसांसाठी जमावबंदी असणार आहे.
विविध सण आंदोलने आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी करू नये या दृष्टिकोनातून नाशिक शहरामध्ये आजपासून जमाव बंदी लागू करण्यात आली आहे नाशिक पोलीस आयुक्तांनी पुढील पंधरवड्यासाठी हे आदेश लागू केले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था तिला बाधा पोहोचू नये. तसेच कोणाला कोरोना संसर्गाला आमंत्रण ठरू नये, या दृष्टिकोनातून महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार सन 1951 चे कलम 37 नुसार आदेश जारी करण्यात आले आहेत.