पुणे : कोरोना व्हायरसची अफवा पसरवणाऱ्या एकावर पुण्यात पहिला गुन्हा दाखल दाखल झाला आहे. येथील प्रसिद्ध हॉटेलमध्ये कोरोनाचे रुग्ण आल्याची खोटी माहिती दिली होती. पुण्याच्या विभागीय आयुक्तानी मिळालेल्या माहितीची पडताळणी केली. यावेळी ही माहिती खोटी असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी खोटी माहिती देणाऱ्या एकावर कोरेगाव पार्क पोलीस स्टोशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#BreakingNews ।कोरोना व्हायरसची अफवा पसरवणाऱ्या एकावर पुण्यात पहिला गुन्हा दाखल। प्रसिद्ध हॉटेलमध्ये कोरोनाचे रुग्ण आल्याची दिली होती माहिती । पुण्याच्या विभागीय आयुक्तानी केली माहितीची पडताळणी । माहिती खोटी असल्याच उघड । कोरेगाव पार्क पोलिसात गुन्हा दाखल @ashish_jadhao #corona pic.twitter.com/rr0Fr7pLZX
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 16, 2020
बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथे कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला, अशी माहिती व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून प्रसरविण्यात आली. व्हॉट्सअप स्टेट्समध्ये रुग्णाचे नाव आणि फोटोसह खोटी बातमी पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात आष्टी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती आकाशवाणीच्या ऑल इंडिया रेडियाने दिली आहे.
आष्टी इथे कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला, अशी खोटी बातमी प्रसरविण्यात आली होती, अशी माहिती आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. एम. सूर्यवंशी यांनी माहिती दिली. या बाबत व्हॉट्सअप स्टेटसमध्ये ज्या व्यक्तीचे नाव आणि फोटो वापरला होता त्याने पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याआधारे पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढचा तपास सुरु आहे.
कोरोना व्हायरचा धोका लक्षात घेऊन नवी मुंबईत दुबईतून आलेल्या नागरिकांना खारघरच्या ग्रामविकास भवनात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या भीतीने खारघरमधील ग्रामविकास भवनाचे कर्मचारी फरार झाल्याने एकच गोंधळ झाला आहे. पळालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार येणार आहेत. याबाबत महापालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत. कोरोनाच्या आयसोलेशनं वॉर्डमधून पळून जाणे कायद्याने गुन्हा आहे. अशा रुग्णांना सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. कायदेतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीसीच्या विविध कलमांनूसार गुन्हा दाखल होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी नागपूर, आग्रा इथून कोरोनाचे रुग्ण पसार झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या.