बारामतीतही पुन्हा लॉकडाऊन वाढवला, १५ जुलैपासून अंमलबजावणी

पुणे जिल्ह्यातील बारामतीत कोविडचा फैलाव होत आहे. काही दिवसात 'कोरोना मुक्त' झालेल्या बारामतीत पुन्हा कोरोनाने डोके वर काढलेय . 

Updated: Jul 14, 2020, 11:31 AM IST
बारामतीतही पुन्हा लॉकडाऊन वाढवला, १५ जुलैपासून अंमलबजावणी title=
ANI Photo । पुणे येथे करण्यात आलेले कडक लॉकडाऊन

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामतीत कोविडचा फैलाव होत आहे. काही दिवसात 'कोरोना मुक्त' झालेल्या बारामतीत पुन्हा कोरोनाने डोके वर काढलेय . मागील दोन दिवसांपासून बारामतीतील कोरोना रुग्णांचा आलेख वाढूू लागल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार  १५ जुलै पासून  पुढील आदेश येई पर्यत बारामती  कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासननाने  घेतला आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथेही लॉकडाऊन कडक करण्यात आला आहे.

बारामतीत  रविवार रोजी एकाच दिवशी तब्बल १८ रुग्ण आढळून आल्याने नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली होती. बाधितांच्या संपर्कात असणाऱ्यांची करोना चाचणी घेतली असता आज पुन्हा नव्याने ५ करोना बाधितांची भर पडली आहे. बारामतीत दोन दिवसात २३  कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून एकूण बाधित रुग्णांची संख्या ६३ वर पोहोचली आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे पुढील काही दिवस बारामती पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून नगरपालिका हद्दीतील सर्व क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.  गुरुवार दि 16 पासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.