निरा- भिमा नदीजोड प्रकल्पात भीषण अपघात

पुण्यातील निरा-भिमा नदीजोड प्रकल्पाची क्रेन तुटून भीषण अपघात झालाय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 21, 2017, 03:58 PM IST
निरा- भिमा नदीजोड प्रकल्पात भीषण अपघात title=

पुणे : निरा –भिमा नदीजोड प्रकल्पाची क्रेन तुटून अपघात झालाय. या अपघातात आठ  कामगारांचा मृत्यू झालाय.

सातारा जिल्ह्यातील भिगवण जवळ अकोले गावातील घटना आहे. क्रेनचे रोप तुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

तावशी ते डाळज दरम्यान काम सुरु असताना हा अपघात घडलाय. अपघातानंतर युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे.