Team India Palyer Arrest : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्याबरोबर टीम इंडियासाठी (Team India) क्रिकेट खेळलेल्या खेळाडूला पोलिसांनी अटक केली. फसवणूकीच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. नागपूर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. अटकनेतर जामिनावर या खेळाडूची सुटका करण्यात आली. प्रशांत वैद्य (Prashan Vaidhya) असं या खेळाडूचं नाव असून चेक बाऊन्सप्रकरणही (Cheque Bounce) ही अटक झाली.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य याच्याविरुद्ध आधीपासूनच अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. या प्रकरणाताच पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत वैद्य यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात वैयक्तिक जातमुचलक्यावर प्रशांत वैद्य यांना जामीन मंजुर करण्यात आला.
प्रशांत वैद्यंना का अटक झाली?
प्रशांत वैद्य यांनी एका स्थानिक व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणावर स्टील खरेदी केलं होतं. या बदल्यात त्या व्यापाऱ्याला प्रशांत वैद्य यांन चेक दिला. व्यापाऱ्याने हा चेक बँकेत जमा केला. पण तो वठला नाही. त्यामुळे व्यापाऱ्याने प्रशांत वैदय यांच्याकडे नव्या चेकच मागणी केली. पण व्यापाऱ्याने केलेल्या दाव्यानुसार प्रशांत वैद्य यांनी नवा चेक देण्यास किंवा पैसे देण्यात नकार दिला. त्यामुळे व्यापाऱ्याने कोर्टात धाव घेतली. पण प्रशांत वैद्य कोर्टात हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात गैर जमानती वारंट जारी केलं. कोर्टाच्या आदेशानुसार नागपूर पोलिसांनी प्रशांत वैद्य यांना अटक केली.
प्रशांत वैद्य हे विदर्भ क्रिकेट संघाच्या क्रिकेट विकास समितीचे प्रमुख आहेत.
प्रशांत वैद्य यांची क्रिकेट कारकिर्द
प्रशांत वैद्य भारतीय क्रिकेट संघासाठी चार एकदिवसीय सामने खेळलेत. यात त्यांनी 15 धावा आणि 4 विकेट घेतल्या. 54 वर्षांचे प्रशांत वैद्य विदर्भ आणि बंगालसाठी स्थानिक क्रिकेट खेळले आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये प्रशांत वैद्य यांच्या नावावर 1000 धावा आणि 170 विकेट जमा आहेत. विशेष म्हणजे प्रशांत वैद्य टीम इंडियासाठी जे सामने खेळले ते सर्व परदेशात खेळले.
प्रशांत वैद्य हे उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज होते. विदर्भ आणि बंगालकडून खेळताना त्यांनी 171 विकेट घेतल्या. 128 धावांवर 6 विकेट ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये प्रशांत वैद्य यांनी 41 सामन्यात 46 विकेट घेतल्या. प्रशांत वैद्य यांनी 1995 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर 1996 मध्ये शारजाहत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ते आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळले.