भुजबळ फार्म परिसरातील रुग्णालयात कर्मचाऱ्यांनीच मारला डल्ला, 8 लाखांची चोरी cctv मध्ये चित्रित

Nashik News: सध्या सगळीकडेच चोरीचे (crime news nashik) प्रमाण वाढू लागले आहे. त्यातचं सतत अशा अनेक बातम्या समोर येताना दिसतात. त्यामुळे नागरिकांमध्ये  भितीचे आणि चिंतेचे वातावरण पसरलेले असते. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार (shocking news) समोर आला आहे. 

Updated: Nov 30, 2022, 01:04 PM IST
भुजबळ फार्म परिसरातील रुग्णालयात कर्मचाऱ्यांनीच मारला डल्ला,  8 लाखांची चोरी cctv मध्ये चित्रित title=

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक: सध्या सगळीकडेच चोरीचे (crime news nashik) प्रमाण वाढू लागले आहे. त्यातचं सतत अशा अनेक बातम्या समोर येताना दिसतात. त्यामुळे नागरिकांमध्ये  भितीचे आणि चिंतेचे वातावरण पसरलेले असते. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार (shocking news) समोर आला आहे. नाशिक येथे हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. यावेळी हा धक्कादायक राजकीय नेते छगन भुजबळ (changan Bhujbal) यांच्या भुजबळ फार्म परिसरात असलेल्या दुर्गा आय हॉस्पिटलमध्ये (Gurga eye Hospital) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक चिंतेत आहेत. (Crime News Marathi Employee stole 8 lakh cash from hospital near Bhujbal Farm Nashik)

पाहा कशी केली चोरी 

नाशिकच्या सिडकोतील भुजबळ फार्म परिसरात (bhujbal farms at nashik) असलेल्या दूर्गा आय हॉस्पिटलमधीलच कर्मचाऱ्याने 5 लाखांच्या रोकडसह हॉस्पिटलच्या हिशोबातील सुमारे 3 लाख असा 8 लाखांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये (cctv) कैद झाला. आकाश लक्ष्मण काळे असे संशयित कर्मचारयाचे नाव आहे. डॉ. भाला यांचे भुजबळ फार्म परिसरात दूर्गा आय हॉस्पिटल आहे. गेल्या 10 नोव्हेंबर रोजी त्यांना त्यांच्या अकोला या मुळगावी जायचे असल्याने त्या घरातून पाच लाखांची रोकड पर्समध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये आल्या. 

हेही वाचा - काहीही! पालिकेच्या आशीर्वादाने सापांची चंगळ, मारणार महागड्या उंदरांवर ताव

ही पर्स त्यांनी त्यांच्या कॅबिनला ठेवली आणि दिवसभर हॉस्पिटलच्या कामात गुंतल्या. सायंकाळी त्यांच्या वाहनचालकाला पैसे द्यायचे असल्याने त्यांनी कॅबिनमधील पर्स पाहिली असता त्यातील 5 लाखांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी हॉस्पिटलचे सीसीटीव्ही तपासले असता त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये डोळे (eye clinic) तपासण्याचे काम करणारा संशयित आकाश काळे यानेच पैसे चोरल्याचे निष्पन्न झाले. 

किती लुटलं ? 

तसेच डॉ. भाला यांनी हॉस्पिटलचा मागील हिशोब तपासला असता, संशयिताने 25 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दहा दिवसात 2 लाख 83 हजार रुपयांची रक्कमही हडप केल्याचे समोर आले. त्यानुसार, संशयित काळे याने 7 लाख 83 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अंबड पोलिसात गुन्हा दाखल (police complaint) करण्यात आला आहे.