गुन्हेगारी टोळ्यांचा पकडण्यासाठी गेलेल्या नागपूर पोलिसांना मोठा दणका

हिवाळी अधिवेशनात राज्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नागपूर पोलिसांचंही त्यांनी कौतुक केलं. मात्र नागपूर पोलिसांनाच गुन्हेगारी टोळ्यांचा मोठा दणका मिळाला. 

Updated: Dec 27, 2017, 09:32 PM IST
गुन्हेगारी टोळ्यांचा पकडण्यासाठी गेलेल्या नागपूर पोलिसांना मोठा दणका title=

नागपूर : हिवाळी अधिवेशनात राज्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नागपूर पोलिसांचंही त्यांनी कौतुक केलं. मात्र नागपूर पोलिसांनाच गुन्हेगारी टोळ्यांचा मोठा दणका मिळाला. 

पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड

दोन गटात झालेल्या मारहाणीनंतर अटक करण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखा पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक करीत आरोपी पसार झाले. या घटनेत गुन्हे शाखा पोलिसांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं. आरोपींनी गाडी जाळण्याचाही प्रयत्न केला. सोमवारी रात्री मोमिनपुरा भागातील इरफान खान उर्फ इप्पा व फिरोज खान या गुन्हेगारात वाद झाला.  

तुफानी दगडफेक

इप्पा टोळीने फिरोज खानवर जीवघेणा हल्ला केला. जखमी फिरोज खानला हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. आरोपी इप्पा टोळी पाचपावली परिसरातील डोबीनगरमध्ये लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. त्यांना पकडण्यासाठी पहाटेच गेलेल्या पोलिसांच्या गाडीवर इप्पा टोळीच्या गुंडांनी तुफान दगडफेक केली.