... आणि ओस पडलेलं 'भुजबळ फार्म' पुन्हा गजबजलं!

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात २०१६ साली छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली. दोन वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर सध्या ते जामिनावर बाहेर आहेत 

Updated: Nov 29, 2019, 06:03 PM IST
... आणि ओस पडलेलं 'भुजबळ फार्म' पुन्हा गजबजलं! title=

नाशिक : गुरुवारी उद्धव ठाकरे सरकारमधील सहा मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) छगन (Chagan Bhujbal) भुजबळ आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ ग्रहण केली. त्यानंतर, आज (शुक्रवारी) छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील भुजबळ फार्मवर गर्दी पाहायला मिळाली. भुजबळ यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय. 

भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ओस पडलेलं भुजबळ फार्म पुन्हा एकदा गजबजल्याचं पाहायला मिळालं. फटाके वाजवत, एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केलाय.

छगन भुजबळ यांची कारकीर्द

- छगन भुजबळ यांचा जन्म १५ ऑक्टोब १९४७ चा...

- राजकारणात प्रवेश करण्याअगोदर छगन भुजबळ भायखळा मार्केटमध्ये भाजी विक्रेते म्हणून काम करत होते

- १९६० च्या दशकात शिवसेनेतून राजकारणात एन्ट्री 

- मुंबईतल्या व्हीजेटीआयमधून त्यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलंय

- १९८५ साली विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी महापौर म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे सोपवली

- १९९१ मध्ये शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले 

- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात २०१६ साली छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली. दोन वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर सध्या ते जामिनावर बाहेर आहेत