वापर नीट करा अन्यथा; 'ती' तुमचा खिसा कधी रिकामा करेल काही कळणारच नाही...

Dating apps cyber crime news: सध्या डेटिंग ॲप्स (dating apps) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले असले तरी या ॲप्सवर (online frauds) सावधगिरीही बाळगणे आता महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे येथे आपली कोणाशी मैत्री होते 

Updated: Nov 29, 2022, 06:02 PM IST
वापर नीट करा अन्यथा; 'ती' तुमचा खिसा कधी रिकामा करेल काही कळणारच नाही... title=

Dating apps cyber crime news: सध्या डेटिंग ॲप्स (dating apps) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले असले तरी या ॲप्सवर (online frauds) सावधगिरीही बाळगणे आता महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे येथे आपली कोणाशी मैत्री होते आणि कोणत्या व्यक्तीशी आपण संवाद साधत आहोत याची आपल्या प्रथनदर्शनी ओळख होत नाही कारण आपण ऑनलाईनद्वारे (online friendship) दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधत असतो. आपल्या समोरासमोर असते ती फक्त एक आभासी भिंत. परंतु जेव्हा आपण त्या गोष्टींमध्ये पुर्णत: अडकून जातो तेव्हा आपल्याला मात्र कसलेच भान उरत नाही. या ॲपचा वापर नीट करा असे अनेकदा बाजावूनही काही लोकं आणि खासकरून तरूण मुलमुली (youngsters and online frauds) याचा बेफिकीरने वापर करताना दिसतात. आता पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर(shocking news) आला आहे. (cyber crime a woman with fake identity grabs crore rupees from a man)

एका डेटिंग ॲप वरील मैत्री खारघर मधील एका उच्च शिक्षित तरुणाला तब्बल दीड कोटी रुपयांना महागात पडली आहे. खारघरमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची (software) डेटिंग ऍपवर मैत्री करून फसवणूक करण्यात आली आहे. रोझ चेन या नावाच्या महिलेने फिलिपिन्स देशातील असल्याचे सांगत क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे अमिश दाखवले. या अमिषाला बळी पडत तरुणाने युएसबी कॉइन एक्सचेंज आणि बिनान्स अँप डाउनलोड करून त्यात तब्बल एक कोटी साठ लाख रुपये गुंतवले (cryptocurrency) असता त्याला दोन कोटी वीस लाख रुपये नफा झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता व्यवहार नाकारण्यात आला. याची चौकशी केली असता युएसबी कॉइन एक्सचेंज हे ॲप बनावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात सायबर भामट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

हेही वाचा - सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड यांचा मोठेपणा; सुनावणी दरम्यान मराठीतून साधला संवाद

अशा अनेक घटना समोर 

गेल्या अनेक वर्षापासून ऑनलाईन फसवणूकीच्या (Online Fraud) घटनांमध्ये वाढ झाली आहे. ऑनलाईन गंडा घालणारे चोर विविध क्लुप्त्या लढवून सर्वसामान्य नागरीकांना गंडा घालत आहेत. आता अशीच घटना समोर आली आहे. या घटनेत एका 79 वर्षीय वृद्धाला डेटिंग अॅपचा (Dating App) नाद चांगलाच भोवला आहे. या डेटिंग अॅपमुळे त्याला 17 लाखाचा गंडा बसला आहे. या प्रकरणी आता वृद्धाने पोलिसात तक्रार केली आहे.या तक्रारीनंतर पोलीस कसून तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,79 वर्षीय वयोवृद्ध हे बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना गेल्या डिसेंबर महिन्यात मोबाईलवर एक अनोळखी व्यक्तीचा कॉल (Unknown call) आला होता. या कॉलवर त्यांना 'तुम्हाला डेटिगंसाठी मुलगी हवी आहे का?' अशी विचारणा करण्यात आली होती. यावर वृद्धाने होकार दिला होता. वृद्धाने अनोळखी व्यक्तीची कॉलवर ऑफर स्विकारताच त्याला काही रक्कम भरण्यास सांगितली होती. यासाठी काही नंबरही दिले होते.आरोपींच्या खात्यात रक्कम भरल्यानंतर वृद्ध व्यक्तीला नेहमी त्या नंबरवरून फोन यायचे आणि पैश्याची मागणी केली जायची. असे साधारण 7 महिने वृद्धासोबत सुरू होते. या दरम्यान त्याला 17 लाखाचा गंडा (Online Fraud)  घालण्यात आला.या प्रकरणात वृद्धाला (Online Fraud) आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Police station) धाव घेतली. याप्रकरणी आता अनोळखी व्यक्तीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा - वाघ राहील नाहीतर आम्ही! जंगलानजीक असणाऱ्या शाळेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात दहशत

कशी घ्याल काळजी 

सोशल डेटिंग अॅपवर काहीवेळा आपण पैसे पाठवण्याचीही चूक करून बसतो. यामुळे तुमचं खातं धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गोष्टी करणं टाळा. कोणीही पैसे मागितले तर त्याला देऊ नका. काही फसवणूक करणारे लोक गडबड करतात. भेटण्यासाठी बोलवतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं गळ घालण्याचा प्रयत्न केला जातो. कोणतीही गडबड करू नका. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा त्यासाठी स्वत: ला आणि नात्याला वेळ