मुंबई / अलिबाग : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पाहणी दौरा केला होता. तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही पाहणी दौरा करुन मुख्यमंत्र्यांना पत्रही सादर केले होते.
३ जून रोजीच्या चक्रीवादळात शेतकरी, बागायतदार तसेच सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या रोहा तालुक्यातील ऐनघर ग्रामपंचायतीतील नुकसानग्रस्तांना १ लाख ३५ हजार रुपयांचे मदतीचे तसेच रोहा तालुक्यातील नागोठणे ग्रामपंचायतीतील नुकसानग्रस्त यशवंत नारायण मढवी - निडी तर्फे नागोठणे या ठिकाणी एकूण ३ लाख ८ हजार ५०० रुपयांचे मदतीचे धनादेश पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
ऐनघर ग्रामपंचायतीतील नुकसानग्रस्त विश्वनाथ विनायक गायकवाड-हेदवली १५ हजार रुपये, हिरा दयाराम वारगुडी-खैरवाडी १५ हजार रुपये, तानाजी गुणाजी वारगुडी-खैरवाडी १५ हजार रुपये, लक्ष्मण मोरा शिर्के-ऐनघर १५ हजार रुपये, मंगला दिनेश कातकरी-सुकेली आवाडी १५ हजार रुपये, संगीता गंगाराम बावदाने- सुकेली धनगरवाडी १५ हजार रुपये, देवूबाई शंकर बावदाने- सुकेली धनगरवाडी १५ हजार रुपये, पार्वती काशिराम शिद- सुकेली गणपतीवाडी १५ हजार रुपये, सुरेश भाग्या वाघमारे-हेदवली मांडवशेत १५ हजार रुपये, असे एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचे मदतीचे धनादेश पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, पंचायत समिती सदस्य संजय भोसले, सभापती सदानंद गायकर, ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत तानू शिंदे, उपसरपंच दिनेश धोंडू जाधव व ग्रा.पं.सदस्य अरुण तांडेल, मंगेश साळवी, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, कृषी अधिकारी अशोक महामुनी, विस्तार अधिकारी महारुद्र फरतडे, सहाय्यक गटविकास अधिकारी पंडीत राठोड, मंडळ अधिकारी दीपक चिपळूणकर आदि उपस्थित होते.
रोहा तालुक्यातील नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्त बाळाराम यशवंत मढवी-निडी तर्फे नागोठणे १५ हजार रुपये, गुलाबा गोपाळ म्हात्रे-निडी तर्फे नागोठणे १५ हजार रुपये, एकनाथ कोडिंबा देवरे-चिकणी १५ हजार रुपये, येसू बबन पवार-चिकणी १ लाख ५८ हजार ५००, परशुराम राणे १५ हजार रुपये, सुरेश बारकू पवार १५ हजार रुपये, सुभाष हरिश्चंद्र जैन १५ हजार रुपये, नामदेव हिरु ताडकर १५ हजार रुपये, अशोक हिरामण पवार-पाटणसई १५ हजार रुपये, धर्मा राघू पवार १५ हजार रुपये देण्यात आले. असे यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, पं.स.सदस्य संजय भोसले, ग्रामपंचायतीचे सरपंच मिलींद धात्रक , सभापती सदानंद गायकर उपभापती शिवराम भाऊ शिंदे, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, कृषी अधिकारी अशोक महामुनी, विस्तार अधिकारी महारुद्र फरतडे, सहाय्यक गटविकास अधिकारी पंडीत राठोड, मंडळ अधिकारी अरुण तांडेल उपस्थित होते.