"नरेंद्र मोदी यांच्यानंतर तुझाच नंबर"; भाजप आमदाराला PFI कार्यकर्त्याकडून जीवे मारण्याची

घराघरात कसाब, अफजल गुरु, युसूफ, याकूब जन्माला येतील ही गोष्ट लक्षात घ्या, असेही या पत्रात म्हटलं आहे

Updated: Oct 8, 2022, 09:11 AM IST
"नरेंद्र मोदी यांच्यानंतर तुझाच नंबर"; भाजप आमदाराला PFI कार्यकर्त्याकडून जीवे मारण्याची title=

अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर : देशभरात विविध ठिकाणी घातलेल्या छाप्यांनंतर केंद्र सरकारने (Central Government) ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.  दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाने पीएफआयवरील (PFI) निवेदन जारी करत बंदी घातल्याचे म्हटले. पीएफआयसह (PFI) तिच्याशी संबंधित आठ संघटनांवरही बंदी घालण्यात आली आहे. मात्र बंदी घातल्यानंतरही या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.  (Death threat to BJP MLA Vijaykumar Deshmukh through letter from PFI activist)

भाजप (BJP) आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांना पीएफआय (PFI) कार्यकर्त्याकडून पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. सोलापूर (Solapur) शहर उत्तरचे आमदार असलेले विजयकुमार देशमुख यांना पत्राद्वारे धमकी देण्यात आलीय. मोहम्मद शफी बिराजदार या सोलापुरातील एका व्यक्तीने पत्र पाठवत ही धमकी दिली आहे.

या पत्रामध्ये तुझे मुंडके धडापासून वेगळे करणार आहे. ही धमकी नाही डायरेक्ट ॲक्शन प्लॅन आहे, अशी धमकी देण्यात आलीय. "अयोध्या (aayodhya), काशी, मथुरेत आमचे सुसाईड बॉम्बर (sucide bomber) एका दिवसात उडवून दहशत निर्माण करतील. आम्ही मुसलमान आहोत. आता आमच्या ब्लॅकलिस्टमध्ये नरेंद्र मोदी (narendra modi), अमित शाह (amit shah), सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde), योगी आदित्यनाथ (yogi adityanath), राज ठाकरे (raj thackeray), देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis), शरद पवार (sharad pawar), अजित पवार (ajit pawar) यांच्यानंतर आता तुझा नंबर आहे," असेही या धमकीच्या पत्रात म्हटलं आहे.

"तुम्ही पीएफआयवर (PFI) बंदी आणून चुकीचे काम केले. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. यापूर्वी सीमीवरदेखील बंदी आणली होती त्याचे काय झाले ? फेल गेले. तुम्ही पीएफआयवर लाख वेळा बंदी घाला तरीही आम्ही फिनिक्सप्रमाणे पुन्हा उभारी घेऊ. तुम्ही लोकांनी आमच्यासारख्या विषारी सापाच्या शेपटीवर पाय टाकलाय. आता आमची मुले गप्प बसणार नाहीत.  घराघरात कसाब, अफजल गुरु, युसूफ, याकूब जन्माला येतील ही गोष्ट लक्षात घ्या," असे खळबळजनक दावे या पत्रात केले आहेत.

 दरम्यान या धमकीच्या पत्रानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहर पोलिसांत तक्रार दाखल केलीय. या तक्रारीनंतर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी चौकशीचे आदेश दिलेत