दख्खनच्या राणीचा वेग वाढणार, पुश अँड पुल इंजिन लावून चाचणी

 मुंबई-पुणे दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन म्हणजेच दख्खनच्या राणीचा वेग पुश अँड पुल या इंजिनामुळे  वाढणार आहे.

Updated: May 16, 2019, 10:34 AM IST
दख्खनच्या राणीचा वेग वाढणार, पुश अँड पुल इंजिन लावून चाचणी title=

मुंबई : मुंबई-पुणे दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन म्हणजेच दख्खनच्या राणीचा वेग पुश अँड पुल या इंजिनामुळे  वाढणार आहे. 'पुश अँड पुल' या इंजिनामुळे प्रवासाचे अंतर 30 ते 35 मिनिटांनी कमी होणार आहे. काही दिवसांपूर्वी डेक्कन क्वीनला पुश अँड पूल इंजिन लावून चाचणी घेण्यात आली. मुंबई ते पुणे 192 किलोमीटरच्या अंतर असून डेक्कन क्वीनला हे अंतर कापण्यासाठी तब्बल 3 तास 15 मिनिटाच्या कालावधी लागतो कर्जत येथे भोर घाट सेक्शन असल्यामुळे बँकर जोडणे आणि काढणे यासाठी अतिरिक्त वेळ लागतो. मात्र आता डेक्कन क्वीनला पुश-पुल पद्धतीचा वापर करण्याच्या निर्णय घेतल्यामुळे वेळेत एक  तासांची बचत होणार आहेत. पूश-पुल पद्धतीमुळे घाट मार्गावर बँकर जोडणे आणि काढणे यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ कमी होणार आहेत.

प्रवास पावणेतीन तासांवर

पुणे स्थानकातून सकाळी 7.15 वाजता डेक्कन क्वीन सुटते. मुंबईत सकाळी 10.25 वाजता पोहचण्याची वेळ आहे. परत जाण्याच्या प्रवासाकरिता मुंबईमधून संध्याकाळी 5.10 वाजता निघून पुण्यात रात्री 8.25 वाजता पोहचते. परंतु आता या डेक्कन क्वीनला  पुश अँड पुल या इंजिन जोडल्याने हा सव्वातीन तासांचा प्रवास पावणेतीन तासांवर येणार आहे. 1 जून रोजी डेक्कन क्वीन 90 व्या वर्षात पदार्पण होणार आहे. या क्वीनच्या वाढदिवसानिमित्त पुणे स्थानकातून गाडीला दुहेरी इंजिन जोडावे. अशी मागणी करत डेक्कन क्वीनला जोडण्यात येणाऱ्या दुहेरी इंजिनामुळे प्रवासाला लागणारा वेळ कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

गाडीला पुढच्या आणि मागच्या बाजूस पुश अँड पुल इंजिन जोडण्याची योजनाआखण्यात आली आहे. यापुर्वी पुश अँड पुल तंत्रज्ञानानुसार मध्य रेल्वे कडून लांबपल्ल्याच्या गाड्यांचा वेग वाढावा यासाठी राजधानी, निजामुद्दीनसह अनेक गाड्यांना दोन इंजिन जोडण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर डेक्कन क्वीनचा वेग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडीस दोन्ही बाजूस इंजिन लावल्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त वेग पकडू शकणार आहे.