Marriage : शेकडो नवरदेवांना लग्नाच्या मंडपातच मिळाला धोका

कुठे आले सनईचे सूर... निघाला जाळ अन धूर... या नवदेवांची अशीच अवस्था झाली. 

Updated: Jan 29, 2023, 08:29 PM IST
Marriage : शेकडो नवरदेवांना लग्नाच्या मंडपातच मिळाला धोका title=

Marriage Fraud : सोलापूरमधील (solapur News) बार्शीत एक धक्कादायक घटना घडली आहे. बार्शीत (Barshi) शेकडो लग्नाळू युवकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नाळू नवरदेव लग्नासाठी मुंडावळ्या बांधून मंगल कार्यालयात आले मात्र वधूचा पत्ताच नाही. शेकडो नवरदेवांना लग्नाच्या मंडपातच मिळाला धोका. लग्न (marriage) झाले नाही मात्र, सगळ्यांचीच फसवणुक झाली. या सगळ्या तरुणांची फसवणुक झाली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  सगळ्यावरचाच विश्वास उडाला असे अनेकजण हा व्हिडिओ पाहून म्हणत आहेत.  लग्नाच्या बहाण्याने फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या लग्नाळू युवकांनी पोलिस स्थानकात धाव घेतली. त्यानंतर बनावट रॅकेटचा पर्दाफाश झाला.

बार्शी शहरातील एका मंगल कार्यालयात सुशिक्षित युवकांचा वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. झटपट लग्न करून देण्याचं आमिष दाखवून वधू-वर मंडळानं त्यांच्याकडून हजारो रूपयांची फी घेतली. मात्र मेळाव्यात लग्नाळू युवकांना वधू दाखवण्यात आली नाही. आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर लग्नाळू युवक, कुटुंबीय, नातेवाईक बार्शी पोलीस ठाण्यात पोचले. त्यानंतर पोलिसांनी वधू-वर मंडळ चालक आणि एजंटांना ताब्यात घेतले.

काय झालयं नेमकं पाहा व्हिडिओ