मुंबई : डेल्टा प्लस व्हेरियंट ही राज्यासाठी चिंतेची बाब असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. डेल्टा प्लसचे सात जिल्ह्यात 21 रुग्ण आढळले आहेत.
देशभरात आत्तापर्यंत 40 कोरोना रुग्णांमध्ये डेल्टा प्लस हा कोरोनाचा प्रकार आढळला असून त्यामध्ये महाराष्ट्रातल्या २१ रुग्णांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात डेल्टा प्लसचा सामना करण्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घेतली जात आहे, याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
आत्तापर्यंत 3400 नमुन्यांपैकी 21 केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. त्याचं प्रमाण 0.005 इतकं आहे. हे प्रमाण जास्त नसलं तरी डेल्टा प्लस व्हेरिएंटचे गुणधर्म मात्र गंभीर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जे 21 रुग्ण सापडले आहेत, त्या रुग्णांसाठी विशेष काळजी घेतली जात आहे. या रुग्णांसाटी वेगळे वॉर्ड तयार करण्यात येत आहेत. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे का? या रुग्णांना आधी कोराना झाला आणि आधी कोराना झाला आणि परत झालाय का? कुठल्या देशातून रुग्ण प्रवास करून आलाय का? रुग्ण कुठल्या देशातून प्रवास करून आलाय का? इत्यादी सविस्तर माहिती घेऊन तपास केला जात असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.
डेल्टा प्लस व्हेरिएंटचा अभ्यास सुरू आहे. सुदैवाने डेल्टा प्लसमुळे एकही मृत्यू झालेला नाही. केंद्राला माहिती पाठवण्याची कार्यवाही करत आहोत, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं.