पुढील आठ दिवस पाऊस नाही; शेतकऱ्यांनो, पेरणी करु नका!

राज्यात मान्सून (Monsoon) दणक्यात सुरु झाला.  मात्र, येत्या आठ दिवसात पावसाची (Rain) शक्यता कमी आहे.  

Updated: Jun 23, 2021, 08:30 PM IST
पुढील आठ दिवस पाऊस नाही; शेतकऱ्यांनो, पेरणी करु नका!
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) दणक्यात सुरु झाला. अनेक जिल्ह्यांना आणि गावांना पावसाने (Rain) चांगलेच झोडपून काढले. तर मुंबईची (Mumbai) चांगलीच दाणादाण उडवून दिली. आता गेले दोन दिवस गायब झाला आहे. काही ठिकाणी हलका पाऊस (Rain) पडत असला तरी तो पेरणीसाठी उपयोगी नाही. येत्या आठ दिवसात पावसाची (Rain) शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ( Farmers) बियाणांची पेरणी (sowing of crops) करु नये, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. याबाबत कृषी मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी पुढील आठ दिवस पावसाची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्यात 14 तालुक्यात 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर  35 तालुक्यात 50 टक्केपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच 232 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस कोसळला आहे. मात्र, राज्यात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. येत्या आठ दिवसात पाऊस कमी पडणार आहे. 80 मिमी ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी म्हटले आहे.
 
खरीपाची पेरणी-27 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. मात्र, पुढील आठ दिवस पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. आम्ही परत आवाहन करतो की आठ दिवसात पाऊस कमी आहे. काळजीपूर्वक पेरणी करावी अशी विनंती आणि आवाहन करत आहे, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.