बायकोने पण आयुष्यात ऐवढे किस घेतले नाही तेवढे... अजित पवारांची हटके प्रतिक्रिया

सत्तेसाठी हापापलो नाही, सत्ता येते आणि जाते, अजित पवारांचं टीकाकारांना उत्तर. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीचा दौरा केला. कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलेय. 

वनिता कांबळे | Updated: Aug 26, 2023, 08:57 PM IST
बायकोने पण आयुष्यात ऐवढे किस घेतले नाही तेवढे... अजित पवारांची हटके प्रतिक्रिया  title=

 

Ajit pawar In Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मतदारसंघ बारामती दौ-यावर आहेत. अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतल्या सुपा पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचं उदघाटन केलं. यावेळी राजकीय टोलेबाजी न करता अजित पवार यांनी तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातात आहेत असं म्हणतं बारामतीकरांना विश्वासात घेतले आहे. 

बारामतीकरांचे प्रेम पाहून भारावून गेलो - अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत झालं, त्यावेळी एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. अजित पवारांचं स्वागत करण्यासाठी एका कार्यकर्त्यानं स्वतःला चक्क क्रेनला लटकून घेतलं होतं. अजित पवारांचं स्वागत करण्यासाठी त्यानं हातात हार घेतला होता.... अजित पवारांची रॅली जवळ येताच या कार्यकर्त्यानं क्रेनमधून लटकूनच अजित पवारांना हार घातला. अजित पवारांनीही या कार्यकर्त्याचा हार घालून घेतला. भाषण करताना अजित पवार यांनी बारामतीकरांचे आभार मानले. बारामतीकरांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो. लोक माझा हात पकडत होते, माझे मुके घेत होते. माझ्या बायकोने पण आयुष्यात माझे इतके किस घेतले नाहीत अशी मिश्लिक टिप्पणी अजित पवार यांनी केली.  

 बारामतीकरांना निधी कमी पडू देणार नाही

फडणवीसांनी कामांना मंजुरी द्यावी. मी निधी देतो असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये केलंय.  विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासनही अजित पवारांनी दिले. तसंच सुदैवाने तिजोरी आपल्या हातामध्ये असल्याचं विधानही अजित पवारांनी केलंय.  ज्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु झाल्यात.

नाईलाजास्तव काही निर्णय घ्यावे लागतात

मी कामात रममाण होणारा कार्यकर्ता आहे.  मला काम करायला आवडतं, मी जातीचा-पातीचा, नात्याच्या-गोत्याचा विचार केला नाही. अनेकवेळा पद भोगत असताना ते लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो. लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमी कामं केली .

विकासकामं करताना कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. भावना असते, श्रद्धा असते, पण नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागतो, लोक टीका करतात, पण नव्या पिढीला माहित आहे, हे सर्व बारामतींकरांसाठी मी करतो.

पुणे-नगर-नाशिक रेल्वेला गती  देणार

पुणे-नगर-नाशिक रेल्वेला गती देण्यासाठी दिल्लीत जाऊन पाठपुरावा करणार असल्याची ग्वाहीसुद्धा अजित पवारांनी दिली. बारामतीकरांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. मला पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची संधी एकनाथरावांच्या मंत्रिमंडळात मिळाली आहे. 

बैठका घेण्यात गैर काय?

महाराष्ट्रात अनेक प्रकल्प येणार आहे. राज्याचे उत्पन्न वाढण्याच्या अनुषंगाने मोठे  प्रकल्प मार्गी लावणार आहे.