Photo Viral : मोठ्या बदलाची गरज; अमृता फडणवीस यांनी योगा करत कुणाला दिला मोलाचा सल्ला?

कला जोपासणं असो किंवा मग... 

Updated: Jan 6, 2022, 03:51 PM IST
Photo Viral : मोठ्या बदलाची गरज; अमृता फडणवीस यांनी योगा करत कुणाला दिला मोलाचा सल्ला?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणं कायम आपल्या राजकीय कारकिर्दीतून कार्यकर्त्यांवर छाप सोडली आहे. फक्त फडणवीसच नव्हे, तर त्यांची पत्नी अमृतासुद्धा त्यांच्या परीनं कायमच समाजापुढं काही मुद्दे ठेवत असतात. 

पतीच्या राजकीय कारकिर्दीपलीकडेही जात अमृता या मुद्द्यांच्या माध्यमातून स्वत: एक व्यक्ती म्हणून मतं मांडताना दिसतात. 

कला जोपासणं असो किंवा मग एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखणं असो, अमृता फडणवीस कायमच आपलं वेगळेपण सिद्ध करुन जातात. 

यावेळी त्या चर्चेत आल्या आहेत ते म्हणजे सोशल मीडियावरील एका पोस्टमुळं. 

जिथे त्या योगसाधनेत मग्न असल्याचं दिसत आहे. अतिशय समर्पक आणि सूचक असं कॅप्शनही त्यांनी आपल्या या पोस्टला दिलं आहे. 

जगाची ही चुकीची बाजू आहे. त्याला योग्य दिशा देत काही बदल करण्याची गरज आहे अशा आशयाचं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. 

अमृता यांनी केलेली ही पोस्ट आणि त्यांनी दिलेलं कॅप्शन पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं.