धर्मा पाटीलांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या

घरी आलेल्या या माणसांच्या हाती बंदूक होती. 

Updated: Jun 30, 2018, 11:53 AM IST
धर्मा पाटीलांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या title=

मुंबई : मंत्रालयात आत्महत्या करणारे ८५ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र  पाटील यांनी यासंदर्भात पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. धमकी द्यायला आलेली देसलेंची माणंस होती असा आरोपही त्यांनी केलाय. घरी आलेल्या या माणसांच्या हाती बंदूक होती. देसलेंची कागदपत्र बाहेर काढून नका नाहीतर तुमच्या जीवाला धोका आहे अशी धमकी दिल्याचे त्यांनी तक्रारी सांगितले.

जमिनिचा मोबदला 

जमिनीच्या मोबदल्यापोटी ९ पट रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचे ५४.४८ लाख रुपये मिळणार होते. याआधी त्यांच्या पाच एकर बागायती जमीनीसाठी फक्त ६ लाख रुपये देण्यात आले होते. पण धर्मा पाटील यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर धुळ्यातील विखरणमध्ये होऊ घातलेल्या वीज निर्मिती प्रकल्पासाठी संपादित १९९ एकर जमिनीचं पुनर्मूल्यांकन करण्यात आलं. यानुसार आता धर्मा पाटील आणि त्यांच्यासोबत आणखी १२ शेतकऱ्यांना अतिरिक्त मोबदला मंजूर करण्यात आला आहे.