दिंडोरीतील राष्ट्रवादीचे धनराज महाले करणार शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेने राष्ट्रवादीला जोरदार हादरा दिला आहे.  

Updated: Aug 16, 2019, 11:51 AM IST
दिंडोरीतील राष्ट्रवादीचे धनराज महाले करणार शिवसेनेत प्रवेश

नाशिक : शिवसेनेने राष्ट्रवादीला जोरदार हादरा दिला आहे. आज दिंडोरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे धनराज महाले शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. महाले यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आता महाले हे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. ते मातोश्रीवर पुन्हा हातात शिवबंधन बांधणार आहेत.

महाले हे राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे होते. दरम्यानस लोकसभा निवडणुकांसाठी पूर्वी शिवसेनेचे माजी आमदार असलेल्या महालेनी लोकसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. दरम्यान, त्यांच्यासोबत दिंडोरीचे माजी खासदार कचरूभाऊ राऊत यांचे चिरंजीव आणि नाशिक महापालिकेच्या विद्यमान भाजपच्या महापौर रंजना भानसी यांचे भाऊ दिलीप राऊत यांचाही शिवसेनेत प्रवेश होणार आहे.

आता पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्याने राखीव मतदारसंघाची गणिते बदलणार आहे. सध्या सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात दुसऱ्या पक्षातून येण्याचे प्रमाण वाढले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेश होत असल्याचे दिसून येत आहे.