नाशिक जिल्ह्यात रोगराईचं साम्राज्य

नाशिक जिल्ह्यात पाण्यामुळे होणाऱ्या आजारात आत्तापर्यंत अडीचशेच्या वर रूग्ण आहेत. तर पाच जणांचा बळी गेलाय.

Updated: Jul 14, 2018, 01:32 PM IST
नाशिक जिल्ह्यात रोगराईचं साम्राज्य   title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक: जिल्ह्यात कुठे पाण्याची टंचाई आहे तर, कुठे अतिवृष्टी. वातावरणातील या विचित्र पद्धतीमुळे रोग पसरत आहेत. १५३ गावं कोरडी आहेत. तिथे टँकरने पुरवठा केला जातोय. त्यामुळे हातपंपावर दुषीत पाणी प्यायल्याने लोकांना आजार होत आहेत. अतिसाराच्या साथीत वीरशेत गावात एकाचा बळी गेला. तर, दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टी झालेल्या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. सुरगाणा तालुक्यात रोहिडे गावात पाणी शुद्ध करण्याची यंत्रणाच नसल्याने पाणी अशुद्ध झालंय.

रूग्णांची संख्या अडीचशेच्याही वर

नाशिक जिल्ह्यात पाण्यामुळे होणाऱ्या आजारात आत्तापर्यंत अडीचशेच्या वर रूग्ण आहेत. तर पाच जणांचा बळी गेलाय. या प्रकाराला जबाबदार धरून ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.. पण २१ व्या शतकात आपण शुद्ध पाणी पोहोचू शकत नसल्याचं पुन्हा सिद्ध झालंय. 

नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या गंभीर.. 

निसर्गाच्या या विरोधाभासात्मक परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमिवर नाशिकरांनो आरोग्य सांभाळा असेच म्हणावे लागेल.