मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर अपघात; १५ जण गंभीर जखमी

सर्व जखमींना एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Updated: Jul 14, 2018, 01:21 PM IST
मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर अपघात; १५ जण गंभीर जखमी title=

पुणे: मुंबई - पुणे एक्सप्रेसवे वर खाजगी बस उलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १५ जण गंभीर तर, ९ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात भाताण जवळ घडला.

सर्वजण मुंबईचे

प्राप्त माहितीनुसार बसमध्ये एकूण २१ प्रवासी होते. हे सर्वजण चेंबूर टिळकनगरमधील एकाच सोसायटीतील रहिवासी आहेत. वर्षा सहलीसाठी हे सर्वजण मुंबईहून लोणावळ्याला निघाले होते. दरम्यान, त्यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढावला.

एमजीएम रूग्णालयात जखमींवर उपचार

सर्व जखमींना एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.