नाशिक: सरकारने कितीही पारदर्शी कारभाराच्या गप्पा मारल्या तरी, व्यवस्था मात्र आहे तिथेच असल्याचे समोर आले आहे. नाशिकमध्ये सध्या शिक्षक विधान परिषद निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीदरम्यान, मतदारांना पैठणी आणि इतर साड्यांचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, या निवडणुकीदरम्यान पैठणी आणि साड्यांसोबतच पैशाचाही वापर मोठ्या प्रमाणवर करण्यात आल्याचे पहायला मिळाले. प्रतिमत २ ते ५ हजार रूपये असा दर ठरल्याचाही दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे पैसे पाकिटाच्या माध्यमातून वाटले जात आहेत.
दरम्यान, विरोधक आणि नागरिकांकडून निवडणुकीदरम्यान केल्या जाणाऱ्या या प्रकाराचा निषेध करण्यात येत आहे. नंदुरबार आणि धुळ्यात नागरिकांनी आमिषापोटी दिल्या जाणाऱ्या साड्यांची होळी केली.