विनयभंगाचा आरोप झाल्यानं डॉक्टरची आत्महत्या

आत्महत्येने परिसरात खळबळ 

Updated: Jan 14, 2020, 11:27 AM IST
विनयभंगाचा आरोप झाल्यानं डॉक्टरची आत्महत्या title=

नाशिक : नाशिकच्या सिन्नर येथील घटना असून या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सातव्या मजल्याच्या टेरेस वरून उडी घेत डॉक्टरने आपलं जीवन संपवलं आहे. विनयभंगाचा आरोप झाल्यानं डॉक्टराने आत्महत्या केली आहे. 

पीडित महिला रुग्ण पित्ताचा त्रास होत असल्यानं डॉक्टर गोविंद गारे यांच्या स्नेहल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. यावेळी उपचार घेत असतांना डॉक्टर गारे यांनी 'मला तू खुप आवडते' अस म्हंटल म्हणून पीडित महिलेने सिन्नर पोलिसांत तक्रार केली होती. 

सिन्नर पोलिसांनी तक्रारीवरून डॉक्टर गारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार ते पाच तासात डॉक्टर गारे यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. तसेच सिन्नर पोलीस डॉ गारे यांच्या आत्महत्याबाबत तपास करीत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच चर्चा सुरू आहे. 

डॉक्टरांकडूनच असे कृत्य झाल्यामुळे महिला सुरक्षित आहेत का? असा सवाल निर्माण झाला आहे. उपचाराकरता महिलांना अनेकदा पुरूष डॉक्टरांकडे जावे लागते. अशावेळी ही घटना समोर आल्याने पुरूष डॉक्टरांकडे जाणं योग्य आहे का? असा सवाल विचारला जात आहे. प्रत्येक रूग्ण हा डॉक्टरांकडे देव म्हणून पाहत असतो. अशावेळी रूग्णांचा असा विश्वासघात होत असेल तर कुणावर विश्वास ठेवला जाईल याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.