प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोदिंया: कोविड काळात करोनाच्या भयावह परिस्थितीही डॉक्टरांनी (doctors in corona) केलेलं काम पाहून आपण सर्वांनीच त्यांच्या कार्याचे कौतुक केले. डॉक्टर अगदी देवासारखे धावून येतात हे खरे परंतु अनेकदा डॉक्टरही रूग्णांबाबत असभ्य वागणूक करताना दिसतात. सध्या असाच एक धक्कादायक (shocking news) प्रकार समोर आला आहे. गोठनगाव येथील डॉक्टर रुग्णांबरोबर असभ्य वागणूक करत असल्याचे समोर आले आहे. परिणामी शिवसेनेच्या वतीने आरोग्य केंद्रासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली असून डॉक्टर यांची बदली करण्यात यावी यासाठी निवेदनही जाहीर केले आहे आणि जर कारवा केली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. गोंदिया जिल्हयाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील गोठनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर हे रुग्णांना योग्य वागणूक देत नसल्याचे त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी या करीता उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू केला आहे.
मोरगाव अर्जुनी तालुक्यातील गोठणगाव परिसर पूर्णतः आदिवासी बहुल भाग असल्याने या परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणुन गोठणगाव येथे प्रथिक आरोग्य केंद्र आहे. मात्र येथिल डॉक्टर सुरेंद्र खोब्रागडे हे रुग्णांना योग्य वागणूक देत नाही, तसेच आठवड्यात बरेच वेळा गैर हजर असतात. त्यासाठी त्यांची बदली करण्यात यावी यासाठीच शिवसेनेच्या (shivsena uddhav balasaheb thackeray) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने 17 नोव्हेंबरला तहसीलदार व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. पण यावर कुठलीही कारवाही करण्यात आली नसल्याने 1 डिसेंबर पासून आरोग्य केंद्रा समोर (protest) आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जो पर्यंत डॉक्टर खोब्रागडे यांची बदली होत. नाही तो पर्यंत उपोषण सुरूच राहील असा पवित्रा या उपोषण कर्त्यानी घेतला आहे.
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णलयातील सुरक्षा रक्षक व अटेंडंट यांचा रुग्णालयाच्या परिसरातच जुगार खेळत असल्याचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे. मनोरुग्णालयात मनोरुग्णांची काळजी घेणे, त्यांच्यावर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे या दृष्टीने प्रयत्न अपेक्षित असते. मात्र, या मनोरुग्णांची (mental hospital) देखभाल आणि उपचाराकडे लक्ष देण्याऐवजी कर्मचारी जुगाराचा खेळ करत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या रुग्णालयात गेल्या काही दिवसांमध्ये काही मनोरुग्णांचा मृत्यू झाल्याची घटनाही घडल्या होत्या. या प्रकरणांची चौकशी सुरू आहेच. अशातच कर्तव्यावर असताना येथील रक्षक आणि अटेंडन्स जुगार खेळत असल्याचा हा व्हिडिओ अनेक सवाल उपस्थित करत आहेत. सध्या तरी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी आणि आणि डॉक्टर या संदर्भात बोलायला तयार नाहीत.
पिंपरी चिंचवड मधल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय म्हणजेच वायसीएम मध्ये मानधनावर डॉक्टरांची (doctor recruitment) पदे भरली जाणार आहेत. 10 वैद्यकीय अधिकारी आणि मेडिसीन, वैद्यकिय विभाग, दंतरोग अशा विविध विभागात 54 निवासी डॉक्टर्स ची भरती केली जाणार आहे. वायसीएम मध्ये रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे येत असलेल्या तानाच्या पार्श्व्हभूमीवर ही भरती केली जाणार आहे.