Doctors' Day दिवशीच नवविवाहित डॉक्टर दाम्पत्यानं घेतला गळफास

Doctors' Day च्या दिवशी पुण्यात घडली मनाला चटका लावणारी घटना 

Updated: Jul 1, 2021, 04:21 PM IST
Doctors' Day दिवशीच नवविवाहित डॉक्टर दाम्पत्यानं घेतला गळफास title=
पुणे: डॉक्टर डे दिवशीच मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. पुण्यात ही धक्कादायक घटना घडली. नवविवाहित डॉक्टर दाम्पत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार नवरा-बायको झालेल्या किरकोळ वादानंतर दोघांनी धक्कादायक पाऊल उचललं. दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याचा वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज सकाळी हा प्रकार घडला.
 
एकीकडे डॉक्टर दिवस असल्यामुळे डॉक्टरांप्रती सन्मान व्यक्त केला जात असतानाच अशाप्रकारे दुःखद घटना झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. निखिल शेंडकर (वय 27) आणि अंकिता निखिल शेंडकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर पती पत्नीची नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
१ जुलै रोजीच का साजरा करतात डॉक्टर्स डे
भारतात १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. हा दिवस देशातील महान चिकित्सक आणि प.बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉयच्या आठवणीत साजरा केला जातो. त्यांचा जन्म १ जुलै 1882 रोजी झाला होता तर 1962 मध्ये वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. देशातील महान डॉक्टरांमध्ये त्यांची गणना होते. एवढेच नाही तर, जगभरात आरोग्य क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.