Man Jumps Off Mumbai Atal Setu : दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या अटल सेतूवर एक भयानक घडली आहे. एका व्यक्तीने अटल सेतूवरुन समुद्रात उडी घेत आत्महत्या केली आहे. हा सर्व थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यापूर्वी देखील मार्च महिन्यात महिला डॉक्टरने अटल सेतूवरून उडी मारुन आत्महत्या केली होती.
अटल सेतूवरुन एका व्यक्तीने उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी 24 जुलै रोजी दुपारी 12.30 दरम्यान घडली. करुतुरी श्रीनिवास (38) असे या व्यक्तीचे नाव. एमटीएचएलच्या बचाव पथकाकडुन आणि सागरी सुरक्षा पोलिसांकडुन त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. श्रीनिवास याने इतक्या टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण आर्थिक संकट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
करुतुरी श्रीनिवास (38) हा डोंबिवलीतील पलावा सीटीत पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीसोबत राहत होता. बुधवारी दुपारी 12.35 वाजण्याच्या सुमारास श्रीनिवास याने मुंबईकडून सुमारे साडेतेरा किलोमीटर अंतरावर अटल सेतूवर जाऊन रस्त्यालगत आपली टाटा नेक्सॉन कार कं. एमएच-05 ईव्ही 0849 उभी करुन खवळलेल्या समुद्रात स्वतःला झोकून दिले. अटल सेतूवरील टोल नियंत्रण कक्षाने न्हावा शेवा पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर एमटीएचएलच्या बचाव पथकाने आणि सागरी सुरक्षा पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र श्रीनिवास त्यांना सापडला नाही.
श्रीनिवास याने आपल्या कारमध्ये फक्त पाकीट ठेवले होते, त्यात त्याचे आधार कार्ड आणि लोढा कंपनीचे ओळखपत्र आढळून आले आहे. त्याच्या कारमधून कोणतीही सुसाईड नोट किंवा त्याचा फोन सापडला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. बी टेक अभियंता असलेला श्रीनिवास काही वर्षापुर्वी कुवेतमध्ये कामाला होता.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
NZ
(50 ov) 300/8
|
VS |
IND
306/6(49 ov)
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.