ललित पाटील फरार होण्यामागे शिंदे गटाच्या दादा भुसेंचा हात? खळबळजनक आरोप

Lalit Patil: ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार झाल्याच्या वादाला आता राजकीय वळण लागलंय.. ललित पाटील प्रकरणात शिंदे गटाचा एक मंत्री सामील असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलाय.. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी धंगेकरांनी केलीय.

Updated: Oct 10, 2023, 05:35 PM IST
ललित पाटील फरार होण्यामागे शिंदे गटाच्या दादा भुसेंचा हात? खळबळजनक आरोप  title=

Lalit Patil: ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार झाल्याच्या वादाला आता राजकीय वळण लागलंय.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुष्मा अंधारे यांनी याप्रकरणात शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांचे नाव घेतले आहे. देवेंद्र फडणवीस ठामपणे भूमिका का घेत नाहीत? असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला आहे. ललीत पाटील फरार होतानाचे दादा भुसे यांचे जिओग्राफीकल लोकेशन, फोन कॉल्स तपासले तर सर्व सत्य समोर येईल असे त्या म्हणाले. आम्ही आतापर्यंत ढिगभर पुरावे दिले आहेत. पण पोलीस, गृह मंत्रालय यावर काही करत नाहीत, असेही त्या म्हणाल्या. 

दरम्यान दादा भुसे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मी चौकशीला सामोरे जायला तयार आहे. अन्यथा आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा गुन्हा दाखल करेन असे दादा भुसे यांनी झी 24 तासशी बोलताना सांगितले.

ललित पाटील प्रकरणात शिंदे गटाचा एक मंत्री सामील असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलाय.. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी धंगेकरांनी केलीय... ससून रुग्णालयातून आरोपी पळून जाण्याच्या प्रकाराबाबत आमदार रवींद्र धंगेकर यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतलं. धंगेकर यांनी दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

ललित पाटील प्रकरणावरून पुरावे नष्ट करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. राज्यकर्त्यांचा सहभाग असल्याशिवाय ड्रग्सचे कारखाने होऊ शकत नाही असा आरोप कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. समाजविघातक काम करणारी व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. तरुण पिढी बरबाद नाही झाली पाहिजे, असे काम सुरू करण्याची गरज आहे. मात्र दुसरीकडे अशा माफियावृत्तीला सरकार, पोलीस पाठिंबा देत असल्याचा घणाघात पटोले यांनी केला. 

विधानसभेच्या अधिवेधनात हे मुद्दे येणारच आहेत, याविरोधात जनचळवळ सुरू झाली पाहिजे, असेही पटोले यावेळी म्हणाले. तसेच आमच्याकडे पण काही माहिती आहे, पण योग्यवेळी मांडणार आहोत असेही त्यांनी सांगितले. मात्र या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचे दिसून येत असून ड्रग्सचा एक दिवसाचा नाही अनेक दिवसांपासून कारखाना आहे. आणि हे राज्यकर्त्यांचा सहभाग असल्याशिवाय होऊ शकत नाही असे पटोले यांनी म्हटले.

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार 

पुण्यातील ड्रग रॅकेटचा (Drug racket) सूत्रधार असलेला ललित पाटील (Lalit Patil) ससून रुग्णालयातून पळून गेलाय. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ललित सोमवारी रात्री आठच्या सुमारास फरार झाला होता. ललित पाटील हा पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार आहे. येरवडा जेलमधील कैदी असलेल्या ललितवर गेल्या 3 जूनपासून ससूननमध्ये (Sassoon hospital) उपचार सुरू होते. ससूनमधून तो ड्रग्जचं रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी (Pune Police) थेट कारवाई करण्यास सुरूवात केली होती. दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या (Drug racket In Sassoon hospital) गेटवर 2 कोटींचं ड्रग्ज सापडलं होतं. ससून रुग्णालयातून तो ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय. दरम्यान, त्याच्या ससूनमधील मुक्कामामागे काही अर्थकारण आहे का?, याचीही चौकशी पोलिसांनी सुरू केलीय. ललितला पुन्हा कारागृहात पाठवण्यासाठी येरवडा कारागृहानं ससून हॉस्पिटलला तब्बल चार पत्र पाठवली होती, अशी माहिती आता समोर आलीय.